Join us

लय खेळलास चल नीघ आता! शमीनं फुलटॉस चेंडूवर उडवला स्मिथचा त्रिफळा (VIDEO)

बॅक टू बॅक ओव्हरमध्ये टीम इंडियाला मिळाल्या दोन विकेट्स स्मिथ पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल झाला बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:37 IST

Open in App

दुबईच्या मैदानात रंगलेल्या सेमी फायनलच्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजांना अगदी स्वस्तात माघारी धाडले. सर्वात धोकादायक असणारा ट्रॅविस हेडनं थोडी फटकेबाजी केली. पण तोही ३९ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. कॅरीसोबत त्याची जोडीही जमली. अर्धशतक झळकवल्यानंतर शतकाच्या दिशेनं वाटचाल करून पुन्हा एकदा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या स्मिथच्या खेळीला अखेर मोहम्मद शमीनं तंबूचा रस्ता दाखवला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शतकाच्या मूडमध्ये दिसत होता स्मिथ, शमीनं ऑफ स्टंप उडवत खेळ केला खल्लास

ऑस्ट्रेलियन डावाच्या ३७ व्या षटकात स्मिथ चेंडू खेळण्यासाठी लेग स्टंपच्या बाहेर निघून मोठा फटका खेळायला गेला. शमीनं यॉर्कर लेंथवर ट्राय केलेला चेंडू थेट ऑफ स्टंपवर आदळला अन् बेल्स पडूनही नाबाद राहिलेल्या स्मिथच्या खेळी ७३ धावांवर ब्रेक लागला. त्याने आपल्या या खेळीत ४ चौकारासह एक षटकार मारला. २०१५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत नॉकआउटमध्ये त्याने सिडनीच्या मैदानात टीम इंडियाविरुद्ध शतकी खेळी केली होती. मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याचा मूड काहीसा तसाच दिसत होता. पण अखेर शमी भारतीय संघाच्या मदतीला धावला. अन् भारतीय संघाला त्याने महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली.

अक्षर पटेलनं पुढच्याच षटकात ग्लेन मॅक्सवेलचा केला करेक्ट कार्यक्रम

 अ‍ॅलेक्स कॅरी आणि स्मिथ जोडी फुटताच अक्षर पटेल  अ‍ॅक्शन मोडमध्ये आला. त्याने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाडी करण्याची क्षमता असलेल्या ग्लेन मॅक्सवेलचा करेक्ट कार्यक्रम केला.आधी मॅक्सवेलनं भारतीय अष्टपैलूला एक उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर लगेच अक्षरनं त्याला त्रिफळाचित केले. ऑस्ट्रेलियन संघ सामन्यावरील पकड मजबूत करत असताना बॅक टू बॅक ओव्हरमधील पडलेल्या या दोन विकेट्समुळे टीम इंडिया पुन्हा मॅचमध्ये आली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मोहम्मद शामीस्टीव्हन स्मिथ