इस्लामाबाद : पाकिस्तानच्या यजमानपदाखाली १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे. ज्या तीन स्टेडियममध्ये सामने होणार आहेत, तेथील तयारी अद्याप होऊ न शकल्यामुळे ही स्पर्धा यूएईत स्थानांतरित होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक क्रिकेट बोर्डावर ICC नाराज?
ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार होत असून भारत आपले सर्व सामने दुबईत खेळेल. अन्य सामने मात्र पाकिस्तानात खेळले जातील. स्पर्धेत आठ संघांचा समावेश आहे. एका वृत्तानुसार,सामन्यांचे आयोजन होत असलेल्या तीनही स्टेडियमचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने आयसीसी नाराज आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण न झाल्यास स्पर्धा यूएईत हलविण्यात येऊ शकते.
चेक लिस्ट'ची पूर्तता न झाल्यास स्पर्धा इतरत्र हलविण्याचा विचार
फ्लड लाइट्सचे काम पूर्ण झालेले नाही. याशिवाय ३० यार्डमधील मैदानाची डागडुजी अद्ययावत अशी नाहीच. आयसीसी पुढील आठवड्यात पुन्हा निरीक्षण करणार असून 'चेक लिस्ट'ची पूर्तता न झाल्यास स्पर्धा इतरत्र हलविण्याचा विचार करण्यात येईल.गडाफी स्टेडियममधील बांधकामाचा व्हिडीओ व्हायरल झाला. निर्धारित २५ जानेवारीपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता नाही.