Pakistan Stadium Renovation Update : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी आता फक्त २१ दिवस उरले आहेत. पण यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला याचं भान नाही, असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने वगळता सर्व सामने पाकिस्तानमधील वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी पाकिस्तानमधील स्टेडियम सर्व सोयींसह सुसज्ज करण्याचे काम सुरु आहे. पण हे काम आयसीसीने दिलेल्या वेळेत पूर्ण होणं मुश्किल असल्याची माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकमधील स्टेडियमचं काम वेळेत पूर्ण होणं 'मुश्किल'
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात १९ फेब्रुवारीला होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईच्या मैदानात रंगणार असून उर्वरित सर्व संघ आपले सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडीच्या मैदानात खेळणार आहेत. तिन्ही स्टेडियम अपग्रेड करण्याचे काम सुरु असले तरी ते वेळेत पूर्ण होईल का? असा प्रश्न आधीपासूनच चर्चेचा विषय ठरतोय. त्यात आता पाकिस्तानमधील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढवल्या आहेत. ज्यांच्याकडे हे काम सोवण्यात आले आहे, त्यांनी वेळेत काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केलाय. पण स्थानिक वृत्तपत्राने काम वेळेत पूर्ण होणं मुश्किल असल्याचे म्हटले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील लढतीसाठी मैदानात सुसज्ज असेल, पण ..
दुसरीकडे पीटीआयनं सूत्रांच्या हवाले दिलेल्या आणखी एका वृत्तानुसार, "सामन्याच्या मेजवानीसाठी स्टेडियम सज्ज असेल. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं क्रिकेट चाहत्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी स्टेडियम सज्ज असेल, हे जे वचन दिलं आहे त्याच काय होणार ते पाहण्याजोगे असेल.
काय म्हणाले होते PCB अध्यक्ष?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं यजमानपद मिळाल्यापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्याला दिलेला नकार, त्यानंतर हायब्रिड मॉडेलचा पर्याय अन् स्टेडियम अपग्रेडचा मुद्दा चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी २८ जानेवारीला रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रावळपिंडी स्टेडियमचा दौरा केला होता. ३१ जानेवारी या डेडलाइनपर्यंत इथंल काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले होते.
Web Title: Champions Trophy 2025 Pakistan Stadium Renovation Impossible To Complete At Deadline Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.