बीसीसीआयच्या नव्या दहा नियमांची चर्चा होताच कर्णधार रोहित शर्मा कमालीचा नाराज झाला. या नियमाबद्दल कोणी सांगितले? बीसीसीआयकडून अधिकृत माहिती तुम्हाला आली का? आधी ती येऊ द्या आणि मग आपण त्यावर बोलू... असे उत्तर रोहितने शनिवारी माध्यमांना दिले. नव्या दहा नियमानुसार भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्माचा व्हिडीओ झाला व्हायरल...
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आगरकारांशी बोलताना दिसला. ते संभाषण माइकमध्ये कैद झाले. 'अब मेरे को बैठना पड़ेगा सेक्रेटरी के साथ.. फॅमिली वॅमिली का डिस्कस करने के लिए. सब मेरे को बोल रहे है (आता मला सचिवांसोबत चर्चेसाठी बसावे लागेल. ते फॅमिलीच्या निर्णयासंदर्भात चर्चा करण्यासाठी. सर्व मलाच नावं ठेवत आहेत.) रोहित बीसीसीआयच्या नव्या दहा सूत्रींबाबत बोलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरूनच रोहित नाराज असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या व्हिडीओमुळे ही शक्यता बळावली आहे.
बीसीसीआयच्या नव्या नियमाची चर्चा
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी अनेक नियम लागू केले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणं अनिवार्य करण्यापासून ते कुटुंबियातील सदस्यांना दौऱ्यावर सोबत नेण्यासंदर्भातील मुद्यांचा नियमावलीत समावेश आहे. ४५ दिवसांच्या दौऱ्यात खेळाडू फक्त १४ दिवस आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकतात. हाच नियमावर खेळाडू नाराज असल्याची गोष्ट रोहित शर्माच्या व्हायरल व्हिडिओमधून दिसून येते.
रोहितवरील भरवसा कायम; शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या संघाची धूरा पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय शुबमन गिल याला मोठ बक्षीस मिळालंय. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या संघात असताना शुबमन गिलवर उप कर्णधार पदाची जबाबदारी दिलीये. मोठ्या स्पर्धेत त्याच्यावर सोपवलेली ही जबाबदारी तो टीम इंडियाचा आगामी कॅप्टन असणार याचे संकेत देणारा आहे.
Web Title: Champions Trophy 2025 Rohit Sharma Video Viral Show Indian Players Unhappy With BCCI New Family Rule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.