ICC Champions Trophy 2025 Semifinalist : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या नवव्या हंगामातील स्पर्धा आता अंतिम टप्प्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या स्पर्धेत सहभागी आठ टॉप संघ दोन गटात विभागले आहेत. 'अ' गटातून भारत आणि न्यूझीलंडच्या संघानं सेमीच तिकीट पक्के केले. दुसरीकडे या गटातील यजमान पाकिस्तानसह बांगलादेशचा खेळ खल्लास झालाय. आता या दोन संघात साखळी फेरीतील अंतिम सामना २ मार्चला रंगणार असून या गटात अव्वल कोण? यावरुनच सेमी फायनलमध्ये कोणता संघ कुणाला भिडणार ते स्पष्ट होईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'ब' गटात हे दोन संघ जोमात, इंग्लंडसह बांगलादेश रिस्क झोनमध्ये
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 'ब' गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे चार संघ आहेत. या गटात प्रत्येक संघाने एक-एक सामना खेळल्यावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या विजयासह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंग्लंड आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांनी पहिला सामना गमावल्यामुळे ते रिस्क झोनमध्ये असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आघाडीच्या दोन संघात कोण मारणार बाजी?
मंगळावारी, २५ फेब्रुवारीला 'ब' गटातील टॉपर दक्षिण आफ्रिका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलिया यांच्यात रावळपिंडीच्या मैदानात सामना रंगणार आहे. यातील विजेता सेमीतील आपलं स्थान भक्कम करेल. दुसरीकडे पराभूत संघाला उर्वरित दोन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.
एक पराभव पडू शकतो महागात
सध्याच्या घडीला या गटात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सेफ झोनमध्ये दिसतात. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघासमोर स्पर्धेत टिकण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आणखी एक पराभव या संघांना स्पर्धेबाहेर करू शकतो. सेमीच्या दोन जागेसाठी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तगडी फाईट पायला मिळू शकते. त्यामुळे या दोघांत एकाला रिस्क असेल. दोन संघांना तगडी फाइट देण्यात अफगाणिस्तानचा संघ इंग्लंडचा पत्ताही कट करू शकतो. त्यामुळे या डेथ ग्रुपमधील लढती बघण्याजोग्या असतील.