Team India Venue, IND vs PAK Champions Trophy 2025: पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये भारत आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळणार आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफी पुढच्या वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर स्पर्धेतील विजेतेपदाचा सामनाही पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार नाही.
महिला विश्वचषक पुढील वर्षी भारतात होणार...
ICC ने गुरुवारी (१९ डिसेंबर) आपला निर्णय दिला आहे. २०२४ ते २०२७ दरम्यान होणाऱ्या काही मोठ्या ICC टूर्नामेंटसाठी यजमानपदाचे अधिकार कुणाला दिले जातील, हे देखील क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले आहे. २०२५ मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक होणार आहे, ज्याचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. तर पुरुषांचा T20 विश्वचषक २०२६ मध्ये खेळवला जाणार आहे. या T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेला संयुक्तपणे देण्यात आले आहे. कारण पाकिस्ताननेही ICC स्पर्धा किंवा अन्य कोणताही सामना भारतात खेळण्यास नकार दिला आहे.
अशा परिस्थितीत पाकिस्तानचा संघ T20 विश्वचषकात आपला सामना श्रीलंकेत खेळणार आहे. २०२८ पर्यंत ICC च्या सर्व स्पर्धा केवळ हायब्रीड मॉडेलनुसारच होतील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2028 चे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. यामध्येही हायब्रीड मॉडेल लागू होईल. यानंतर २०२९-३१ मध्ये ऑस्ट्रेलियात वरिष्ठ महिलांची स्पर्धाही होणार आहे.
महत्त्वाचे निर्णय
- पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे. पण भारतीय संघ आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळणार आहे.
- ही ५० षटकांची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान म्हणजेच २०२५ मध्ये खेळवली जाईल.
- २०२४ ते २७ दरम्यान भारत आणि पाकिस्तानने आयोजित केलेल्या सर्व ICC स्पर्धांमध्ये हायब्रीड मॉडेल लागू होईल.
- पाकिस्तानचा संघ महिला विश्वचषक २०२५ आणि पुरुषांच्या T20 विश्वचषक २०२६ साठी भारत दौऱ्यावर जाणार नाही.
- पाकिस्तानला २०२८ च्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे.
Web Title: Champions Trophy 2025 to be held in Pakistan Neutral venue icc announced hybrid model 2028 ind vs pak match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.