ग्रास आइसलेट : श्रीलंका - वेस्ट इंडिज दरम्यान सुुरूअसलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदीमल याने चेंडूशी छेडछाड केली असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केला.
आयसीसीने टिष्ट्ववटरवर या संदर्भात घोषणा केली. आयसीसीने चेंडूचा आकार बदलण्यासंदर्भातील नियमाचे चंदीमलने उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. सामन्याच्या तिसºया दिवशी श्रीलंकेच्या संघाने चेंडू बदलण्याच्या निर्णयावर नाराज होत मैदानात उतरण्यास नकार दिला.
पंच अलीम दार व इयान गाऊल्ड चेंडूच्या आकाराबाबत समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी या चेंडूवर पुढील खेळ होणार नसल्याचे सांगितले. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ, श्रीलंकेचे प्रशिक्षक चंडिका हथुरासिंघे व व्यवस्थापक असांका गुरुसिंघा यांच्या दरम्यान चर्चा झाल्यानंतर खेळ सुरूझाला.
आयसीसीने श्रीलंकेला पाच धावांचा दंड ठोठावला आहे. मात्र, या प्रकरणी ही शिक्षा खूपच किरकोळ आहे. सामन्यात कोणत्याही प्रकारच्या नियमाचे उल्लंघन झाले असल्याचे आढल्यास सामना संपल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आयसीसीने सांगितले आहे.
श्रीलंका क्रिकेटने म्हटले, आमचे खेळाडू कोणत्याही चुकीच्या कृत्यात सहभागी नाहीत. आम्ही त्यांना मैदानात उतरण्यास सांगितले. सामन्यात खिलाडूवृत्ती कायम राहायला हवी.
>मी निर्दाेष असल्याचे श्रीलंकेचा कर्णधार
दिनेश चंदीमल याने वृत्तसंस्थेला सांगितले. चंदीमल म्हणाला, आयसीसी आचारसंहितेच्या २.२.९ कलमाचे उल्लंघन केलेले नाही. या संदर्भात सामनाअधिकारी जवागल श्रीनाथ ही कसोटी संपल्यानंतर या प्रकरणाची सुनावनी करतील. सामना अधिकाºयांनी शुक्रवारी शेवटच्या सत्राचे रिप्ले पाहून चंदीमलवर आरोप निश्चित केले होते.
Web Title: Chandimal is accused of mischief over the ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.