नवी दिल्ली - कर्णधार दिनेश चंडिमल आणि अष्टपैलू अॅन्जेलो मॅथ्यूज यांनी फटकावलेल्या दमदार शतकांच्या जोरावर श्रीलंकेने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र मॅथ्यूज बाद झाल्यानंतर श्रीलंकेची तळाची फळी झटपट कापून काढत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरील वर्चस्व कायम राखले आहे. तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने 9 बाद 356 धावांपर्यंत मजल मारली असून, पाहुणा संघ अद्याप 180 धावांनी पिछाडीवर आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेने कालच्या 3 बाद 131 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर अष्टपैलू क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज आणि कर्णधार दिनेश चंडिमल यांनी संयमी पवित्रा घेत सावध सुरुवात केली. पहिल्या सत्रात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आक्रमक मारा करून ही जोडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यात यश मिळाले नाही. सकाळच्या सत्रात उपाहारापर्यंत एकही गडी न गमावता श्रीलंकेने दरम्यान, मॅथ्युजने आपले शतक पूर्ण केले.
अखेर भारतीय संघाला हैराण करणारी जोडी फोडताना रवीचंद्रन अश्विनने मॅथ्यूजची विकेट काढली. 111 धावांची खेळी करणाऱ्या मॅथ्यूजने चंडिमलसमवेत 181 धावांची भागीदारी केली. मॅथ्यूज बाद झाल्यानंतर चंडिमलने मोर्चा सांभाळला. त्याने आपले शतक पूर्ण करतानाच सदिरा समरविक्रमासोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाला तीनशेपार पोहोचवले. मात्र समरविक्रमा बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला.
अश्विनने पाठोपाठच्या षटकात रोशन सिल्व्हा आणि निरोशन डिकवेला यांना माघारी धाडले. तर शमीमे सुरंगा लकमल आणि जडेजाने लहिरू गमागेची विकेट काढून लंकेची अवस्था 9 बाद 343 अशी केली. अखेरीच तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने 9 बाद 356 धावा फटकावल्या होत्या. एक बाजून लावून धरणारा दिनेश चंडिमल 147 धावांवर खेळत होता. तर लक्षण सदाकन याने अद्याप खाते उघडले नव्हते. भारताकडून अश्विनने तीन, तर शमी, इशांत आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
Web Title: Chandimal, for centuries of Mathews, India still has the opportunity to take a big lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.