Join us  

Chandrayaan-2: 'चांद्रयान-2'बद्दल क्रिकेटपटू म्हणाले ' हम होंगे कामयाब'

क्रिकेटपटूंनी 'चांद्रयान-2'चे कौतुक करत इस्त्रोला धीर देण्याचेही काम केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 2:01 PM

Open in App

मुंबई : इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. पण इस्त्रोची ही झेप फार मोठी आहे. त्यामुळेच क्रिकेटपटूंनी 'चांद्रयान-2'चे कौतुक करत इस्त्रोला धीर देण्याचेही काम केले आहे.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, " ख्वाब अधुरा राहा, पण हौसले जिंदा हैं. इस्त्रो वो हैं, जहा मुश्कीले शरमिंदा हैं. हम होंगे कामयाब"

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, " इस्त्रोच्या वैज्ञानिकांचा आम्हा साऱ्या भारतीयांना अभिमान आहे. अंताराळ विज्ञानामध्ये तुम्ही भारताला लीडर बनवले आहे. ही मोहिम लाखो भारतीय मुलांसाठी प्रेरणास्थान ठरेल. जय हिंद!"

भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीर म्हणाला की, " हे अपयश नाही. जेव्हा तुम्ही चुकांमधून शिकत नाही त्या गोष्टीला अपयश म्हणतात. आपण पुन्हा जोरदार प्रयत्न करू. इस्त्रो टीमच्या स्पिरीटला माझा सलाम. करोडो भारतीयांना एकत्रितपणे आणून तुम्ही स्वप्न दाखवले. आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे."

भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, " विज्ञानामध्ये कधीही अपयश येत नाही. आम्ही पुन्हा प्रयोग करू आणि पुन्हा यश प्राप्त करू. इस्त्रोच्या वैज्ञानिकांबद्दल मला अभिमान आहे."

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला की, " कोशिश करनेवालोंकी कभा हार नही होती. आम्हाला तुमचा अभिमान आहे."

भारताचा सलामीवीर शिखर धवन म्हणाला की, " आम्हाला इस्त्रोचा अभिमान आहे. तुम्ही अपयशी झाला नाहीत, तम्ही आम्हाला फार पुढे नेऊन ठेवले आहे. हे स्वप्न कायम जगत राहा."

भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण म्हणाला की, " आपण एक माहिम सुरु केली आहे आणि नक्कीच आपण त्यामध्ये यशस्वी ठरू. आम्हाला तुमचा अभिमान आहे."

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या म्हणाला की, " आम्हाला तुम्ही स्वप्न पाहायला शिकवलं, त्याबद्दल इस्त्रोचे अभिनंदन. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे."

भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरपर्यंत पोहोचले, तोपर्यंत त्याचा नियोजित दिशेनं प्रवास सुरळीत सुरू होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात अडचणी निर्माण झाल्या.

टॅग्स :चांद्रयान-2इस्रोगौतम गंभीरविरेंद्र सेहवागरवी शास्त्रीक्रुणाल पांड्याहरभजन सिंग