IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला मंगळवारी राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. २२३ धावा उभ्या करूनही KKR ला जॉस बटलरने तडाखा दिला आणि RR चा दोन विकेट्सने विजय पक्का केला. बटलर ६० चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या आणि राजस्थानने २ विकेट्सने सामना जिंकला. आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठऱला. २०२० मध्ये राजस्थानने पंजाब किंग्सविरुद्ध २२४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. याच विक्रमाशी राजस्थानने आज बरोबरी केली. KKR च्या पराभवानंतर मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) संतापलेला दिसला आणि त्याने अजब मागणी केली आहे.
गोलंदाजांची सर्वात मोठी अडचण ही आहे की त्यांना खेळपट्टी २० षटकांमध्ये कोणतीही मदत करत नाही किंवा चेंडू स्वींग होत नाही. सपाट खेळपट्टी आणि चेंडूत कोणतीही हालचाल नसल्यामुळे या मोसमात गोलंदाजांना चांगलाच फटका बसला आहे. यावर गौतम गंभीर म्हणाला की, चेंडू तयार करणारी कंपनी बदलणे आवश्यक आहे. जर एखादी कंपनी ५० षटके टिकणारा चेंडू तयार करू शकत नसेल, तर त्या कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीच्या चेंडूने खेळावे लागेल. आयपीएल सामन्यांमध्ये फक्त कुकाबुरा बॉल वापरण्याची सक्ती आहे का?
समालोचक हर्षा भोगले यांनीही गौतम गंभीरच्या मताशी सहमती दर्शवली आहे. आपल्याला बॅट आणि बॉलमध्ये अधिक संतुलन निर्माण करण्याची गरज आहे, असे त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले.