Join us  

सचिनविरुद्धचे आरोप फेटाळले

(सीएससी) आपल्या कार्याच्या मर्यादेविषयी समाधानकारक माहिती न मिळाल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सीएससीचा सदस्य बनण्यास नकार दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 4:03 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीमध्ये (सीएससी) आपल्या कार्याच्या मर्यादेविषयी समाधानकारक माहिती न मिळाल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सीएससीचा सदस्य बनण्यास नकार दिला. यामुळे बीसीसीआयचे नैतिक अधिकारी निवृत्त न्या. डी. के. जैन यांनी सचिनवर लावण्यात आलेले परस्पर हितसंबंधाचे आरोप फेटाळले.जैन यांनी आपल्या दोन पानांच्या निर्णयामध्ये स्पष्ट केले की, ‘सचिन तेंडुलकराने आपली बाजू स्पष्ट केली असून तो आता सीएसीचा सदस्य म्हणून कार्यरत राहणार नाही. त्यामुळे या प्रकरणाला आता काहीच अर्थ नसून हा विषय येथेच समाप्त होत आहे.’ त्याचप्रमाणे, ‘बीसीसीआयने सीएसी सदस्यांचे कार्यक्षेत्र निर्धारीत केले, तर मात्र सचिन पुन्हा एकदा सीएसीचा सदस्य होण्याचा विचार करु शकतो.’ (वृत्तसंस्था)