Join us  

IPL 2022 Mega Auction मध्ये वॉशिंग्टन सुंदरवर लावलेल्या बोलीत 'घोळ' झाला; Kavya Maran ला २५ लाखांचा फटका बसला, Video  

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या ऑक्शनमध्ये २०४ खेळाडूंसाठी जवळपास ५५१ कोटींची बोली लावली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 3:41 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या ऑक्शनमध्ये २०४ खेळाडूंसाठी जवळपास ५५१ कोटींची बोली लावली गेली. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी ऑक्शनर ह्युज एडमंड्स हे चक्कर येऊन पडले अन् आयत्यावेळी चारू शर्मा (  Charu Sharma) यांना बोलावण्यात आले. चारू शर्मांनी कोणताच गृहपाठ केलेला नसतानाही ऑक्शनरची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. परंतु त्यांच्याकडून झालेल्या मोठ्या घोळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. IPL 2022 Mega Auction मध्ये चारू शर्मा यांनी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याच्यावरील बोलीत घोळ केला आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या एका चूकीमुळे काव्या मारनच्या ( Kavya Maran) सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाला २५ लाखांचा फटका बसला.  

वॉशिंग्टन सुंदरवर ६.५० कोटींची बोली सुरू असताना गुजरात टायटन्सने ६.७५ कोटींची बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने ७ कोटींची बोली लावली. त्यानंतर चारु शर्माला ७.२५ अशी पुढील बोली म्हणायची होती, परंतु त्यांनी ७. ५० कोटीची मागणी केली. चारू शर्मा यांनी थेट वॉशिंग्टनची किंमत ५० लाखांनी वाढवली. त्यांची ही चूक कोणाच्याच लक्षात आली नाही आणि बोली पुढे सुरूच राहिली.   वॉशिंग्टनची बोली ८.७५ कोटींवर गेल्यानंतर गुजरातने माघार घेतली आणि सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात अष्टपैलू खेळाडू दाखल झाला. पण, चारू शर्मांच्या चुकीमुळे SRH ला २५ लाख अतिरिक्त भरावे लागले.  खलिल अहमद याच्याबाबतीतही अशीच चूक झाली. मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी ५.२५ कोटींची बोली लावली होती,  परंतु चारूने त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पाठवले. 

टॅग्स :आयपीएल लिलावसनरायझर्स हैदराबादवॉशिंग्टन सुंदर
Open in App