Join us  

चेन्नईची दिल्लीवर एका धावेनं मात

By admin | Published: April 10, 2015 12:00 AM

Open in App

चेन्नईची पडझड थांबवत ड्युप्लेसिसने 32 धावा केल्या.

चेन्नईला चांगली सुरुवात करून देणा-या ड्वेन स्मिथने 34 धावा केल्या.

ड्युप्लेसिसप्रमाणेच चेन्नईचा कप्तान महेंद्र सिंग ढोणीनं संयमी खेळ करत 30 धावा केल्या आणि चेन्नईला 150 धावांचा टप्पा गाठून दिला.

तिस-या क्रमांकावर आलेल्या सुरेश रैनाला लवकरच तंबूत धाडल्यावर आनंद व्यक्त करताना दिल्लीचे खेळाडू.

दिल्लीच्या नाथन कोल्टरने 30 धावांमध्ये 3 बळी घेत चेन्नईच्या धावसंख्येला लगाम घातला.

मॉर्केल व अग्रवाल वगळता महाराष्ट्राच्या केदार जाधवने दिल्लीला सावरायचा ब-यापैकी प्रयत्न करत 20 धावा केल्या.

चेन्नईनं दिलेलं 151 धावांचं लक्ष्य पार करताना दिल्लीची दमछाक झाली. दोन आकडी धावसंख्या अवघ्या तीन जणांना गाठता आली. त्यातल्या मयंक अग्रवालने 15 धावा केल्या.

आयपीएल - 8 मध्ये सर्वाधिक 16 कोटी रुपयांची बोली लावून दिल्ली डेअरडेव्हिल्सने युवराज सिंगला विकत घेतलं परंतु पहिल्या सामन्यात युवी छाप पाडू शकला नाही. अवघ्या 9 धावा करून युवी बाद झाला.

एकदा जीवदान मिळूनही त्याचा लाभ उठवता न आलेला ब्रँडन मॅक्युलम 4 धावांवर बाद झाला.

सामना रंगतदार केला एकाकी झुंज दिलेल्या एल्बी मॉर्केलने. नाबाद 73 धावांची खेळी केलेल्या मॉर्केलने शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना चौकार आशिष नेहराला चौकार मारला आणि चेन्नईनं अवघ्या एका धावेनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला.

दिल्लीला 20 षटकांमध्ये 151 धावा जिंकायला हव्या असताना चेन्नईच्या आशिष नेहरानं टिच्चून गोलंदाजी करत अवघ्या 25 धावा देत 3 बळी टिपले आणि सामनावीराचा किताब मिळवला.