Join us  

चेन्नई दहाव्यांदा अंतिम फेरीत; गुजरात टायटन्सला १५ धावांनी नमवले

चेन्नईने गुजरातविरुद्ध पहिल्यांदाच विजयही मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने अपेक्षित खेळी केली खरी, मात्र त्याच्या फलंदाजीत फारशी आक्रमकता दिसली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 5:25 AM

Open in App

चेन्नई : यंदाच्या आयपीएलमध्ये थेट अंतिम फेरी गाठताना चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या क्वालिफायर लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सला १५ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर २० षटकांत ७ बाद १७२ धावा केल्यानंतर चेन्नईने गुजरातला २० षटकांत १५७ धावांवर गुंडाळले. गुजरात संघ आता शुक्रवारी दुसऱ्या क्वालिफायर लढतीत खेळेल. यावेळी घरच्या मैदानावर खेळताना गुजरातचा सामना लखनौ-मुंबई या लढतीतील विजेत्याविरुद्ध होईल.

यासह चेन्नईने गुजरातविरुद्ध पहिल्यांदाच विजयही मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने अपेक्षित खेळी केली खरी, मात्र त्याच्या फलंदाजीत फारशी आक्रमकता दिसली नाही. परंतु, त्याचा अपवाद वगळता इतर प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. गुजरातचा अर्धा संघ ८८ धावांवर बाद करत चेन्नईने सामन्यावर पकड मिळवली. राशिद खानने पुन्हा एकदा शानदार फटकेबाजी करत गुजरातच्या आशा उंचावल्या होत्या. 

१९व्या षटकात तुषार देशपांडेने त्याला बाद करून गुजरातच्या आशा संपुष्टात आणल्या. दीपक चहर, महीश तीक्ष्णा, रवींद्र जडेजा आणि मथीशा पथिराणा यांनी मोक्याच्यावेळी गुजरातला हादरे देताना प्रत्येकी २ बळी घेतले.

त्याआधी, ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉन्वे यांनी वेगवान सुरुवात करून दिल्यानंतरही चेन्नईचा डाव गडगडला. गुजरातने मधल्या षटकांमध्ये पुनरागमन केले. दुसऱ्याच षटकात वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाल्यानंतर ऋतुराजने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवताना कॉन्वेसह ६३ चेंडूंत ८७ धावांची सलामी दिली. मोहित शर्माने ११व्या षटकात ऋतुराजला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर चेन्नईने ठरावीक अंतराने बळी गमावले. रवींद्र जडेजाने छोटेखानी फटकेबाजी करत चेन्नईला समाधानकारक मजल मारून दिली.

आयपीएलमध्ये १५०० हून अधिक धावा आणि १५० बळी अशी शानदार अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा हा ड्वेन ब्रावोनंतरचा दुसरा क्रिकेटपटू ठरला. आयपीएलच्या एका सत्रात ७०० धावांचा पल्ला पार करणारा शुभमन गिल हा विराट कोहलीनंतरचा केवळ दुसरा भारतीय ठरला.

ऋतुराज-डेवोन कॉन्वे यांनी सीएसकेकडून नवव्यांदा अर्धशतकी भागीदारी करत महेंद्रसिंग धोनी-रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. मुरली विजय-मायकल हसी यांनी सर्वाधिक १३ वेळा अशी दमदार भागीदारी केली.

निर्धाव चेंडू आणि वृक्षारोपणगुजरात-चेन्नई सामन्यादरम्यान प्रत्येक निर्धाव चेंडूवर स्कोअर बोर्डवर दिसत असलेल्या झाडाच्या फोटोने सर्वजण विचारात पडले. मात्र, यामागे बीसीसीआयने भन्नाट कल्पना आखल्याचे कळल्यानंतर सर्वांनीच या प्रयोगाचे कौतुक केले. यंदाच्या आयपीएलमधील प्रत्येक प्ले ऑफ लढतीतील प्रत्येक निर्धाव चेंडूवर बीसीसीआय ५०० झाडं लावणार आहे.

खेळाडू              ऋतुराज गायकवाड झे. मिलर गो. शर्मा      ६०    ४४      ७/१   डेवोन कॉन्वे झे. राशीद गो. शमी     ४०    ३४      ४/०   शिवम दुबे त्रि. गो. अहमद     ०१    ०३      ०/०अजिंक्य रहाणे झे. गिल गो. नळकांडे     १७    १०      ०/१   अंबाती रायुडू झे. शनाका गो. राशीद     १७    ०९      १/१रवींद्र जडेजा त्रि. गो. शमी       २२    १६      २/०महेंद्रसिंग धोनी झे. पांड्या गो. शर्मा     ०१    ०२      ०/०मोईन अली नाबाद      ०९    ०४      ०/१ 

खेळाडू              रिद्धिमान साहा झे. पथिराना गो. चाहर     १२    ११      २/०   शुभमन गिल झे. काॅन्वे गो. चाहर     ४२    ३८      ४/१   हार्दिक पांड्या झे. जडेजा गो. तिक्ष्णा      ०८    ०७      १/०         दसुन शनाका झे. तिक्ष्णा गो. जडेजा     १७    १६      १/१   डेव्हिड मिलर त्रि. गो. जडेजा     ०४    ०६      ०/०   विजय शंकर झे. गायकवाड गो. पथिराना      १४    १०      ०/१राहुल तेवतिया त्रि. गो. तिक्ष्णा      ०३    ०५      ०/० राशीद खान झे. काॅन्वे गो. देशपांडे       ३०    १६      ३/२दर्शन नळकांडे धावबाद (सेनापती)       ००    ०१      ०/०नूर अहमद नाबाद        ०७    ०५      १/०मोहम्मद शमी झे. चाहर गो. पथिराना        ०५    ०५      १/०

टॅग्स :आयपीएल २०२३
Open in App