पाऊस टीम इंडियाचा खेळ बिघडवण्याची शक्यता; चेन्नईत असा आहे हवामानाचा अंदाज

Chennai Ind vs Aus Weather Forecast Update: या स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलियासोबत सहा वर्षांनी सामना होत आहे. २०१७ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला हरविले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:32 PM2023-03-22T12:32:07+5:302023-03-22T12:32:42+5:30

whatsapp join usJoin us
Chennai Ind vs Aus Weather Forecast Update: Rain likely to spoil Team India's game; weather forecast in Chennai at India vs Australia third one day match | पाऊस टीम इंडियाचा खेळ बिघडवण्याची शक्यता; चेन्नईत असा आहे हवामानाचा अंदाज

पाऊस टीम इंडियाचा खेळ बिघडवण्याची शक्यता; चेन्नईत असा आहे हवामानाचा अंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघासाठी आजचा सामना निर्णायक आहे. वन डे क्रमवारीत एक नंबरसाठी आजचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकण्याची आवश्यकता आहे. पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसरा दारुण पराभवाचा झाला होता. तिसरा सामना महत्वाचा असला तरी पाऊस खेळ बिघडविण्याची शक्यता आहे. 

 IND vs AUS दरम्यानचा तिसरा वनडे आज दुपारी दीड वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. मात्र, मॅचवर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने दुपारी आणि सायंकाळी असा दोनवेळा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

आजचा सामना जिंकला तर भारतीय संघ आणखी एक विक्रम करणार आहे. सलग आठवी वनडे सिरीज जिंकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. दुपारी १ वाजता टॉस उडविला जाणार आहे. अॅक्युवेदरनुसार दुपारी १२ ते सायंकाळी ७ पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. सायंकाळनंतर पावसाची शक्यता कमी कमी होत जाईल. यामुळे जर पाऊस पडला तर ओव्हर कमी केल्या जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर डकवर्थ लुईस नियमानुसार समोरच्या संघाला लक्ष्य देखील दिले जाऊ शकते. 

विशाखापटट्नम मध्ये देखील पावसाचा अंदाज होता. परंतू, भारतीय संघाने घाई केल्याने सामनाच पावसापूर्वी संपला होता. आता दोन्ही संघांनी सिरीजमध्ये १-१ सामने जिंकून बरोबरी केली आहे. या स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलियासोबत सहा वर्षांनी सामना होत आहे. २०१७ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला हरविले होते. 

Web Title: Chennai Ind vs Aus Weather Forecast Update: Rain likely to spoil Team India's game; weather forecast in Chennai at India vs Australia third one day match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.