हैदराबाद : आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स रविवारी जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने असतील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव मिळण्याची आशा आहे.मुंबई इंडियन्सचा फायनलमध्ये दाखल होण्याच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश होता. स्पर्धेच्या या टप्प्यात त्यांनी तीनवेळा चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केलेला आहे. त्यात मंगळवारी चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायरचाही समावेश आहे.दरम्यान, आकडेवारीचा विचार केला तर कुणाला पसंती दर्शविता येत नाही. कारण दोन्ही संघ अनेकदा फायनलमध्ये पोहोचलेले असून, अनेकदा जेतेपदही पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने आतापर्यंत चारवेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात तीनवेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यापैकी दोनदा २०१३ व २०१५ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव केलेला आहे.दुसऱ्या बाजूचा विचार करता तीनवेळा जेतेपद पटकावणाºया चेन्नई सुपरकिंग्सने आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यांच्यासाठी यंदाचे सत्र शानदार ठरले. विशेषत: गेल्यावर्षी दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन करीत जेतेपद पटकावले होते. चेन्नईला अंतिम लढतीपूर्वी आपली रणनीती योग्यपद्धतीने तयार करावी लागेल. कारण यंदाच्या मोसमात मुंबई संघाने त्यांचा तीनवेळा पराभव केलेला आहे. रोहित अॅन्ड कंपनीला चेन्नईच्या फिरकीपटूंना समर्थपणे तोंड द्यावे लागले.मुंबई संघाला चार दिवस विश्रांती घेण्याची संधी मिळली. आता हा संघ धोनीच्या संघाविरुद्ध यंदाच्या मोसमातील चौथा विजय व आयपीएलमध्ये चौथे विजेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे. आयपीएल स्पर्धेनंतर विश्वकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. आॅस्ट्रेलियातर्फे निलंबित करण्यात आलेले स्टार स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरली. चेंडू छेडछाड प्रकरणात वर्षभरासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी शानदार पुनरागमन केले. वॉर्नरने आयपीएलमध्ये६९२ धावा केल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा खेळाडू आहे. जॉनी बेयरस्टॉसोबतची त्याची जोडी यशस्वी ठरली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- चेन्नई की मुंबई?...अंतिम सामना आज, चौथ्यांदा जेतेपद कोणाकडे?
चेन्नई की मुंबई?...अंतिम सामना आज, चौथ्यांदा जेतेपद कोणाकडे?
आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वांत यशस्वी संघ मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्स रविवारी जेतेपदासाठी पुन्हा एकदा आमने-सामने असतील. या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळाचा अनुभव मिळण्याची आशा आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 5:21 AM