Join us  

Ravindra Jadeja IPL 2022 : महेंद्रसिंग धोनी जुळवतोय Play Offsचं गणित अन् इथे प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजा माघार घ्यायच्या तयारीत! 

आयपीएल २०२२मधून आतापर्यंत मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ स्पर्धेतून बाद झाला आणि उर्वरित ३ स्थानांसाठी आता ८ संघ शर्यतीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 3:29 PM

Open in App

Chennai Super Kings play offs hope IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा पहिला मान गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) पटकावला. मंगळवारी झालेल्या लढतीत गुजरातने ६२ धावांनी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले आणि १८ गुणांसह प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. आयपीएल २०२२मधून आतापर्यंत मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ स्पर्धेतून बाद झाला आणि उर्वरित ३ स्थानांसाठी आता ८ संघ शर्यतीत आहेत. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK ) प्ले ऑफचे गणित जुळवणे अवघडच आहे, पण अशक्य नाही. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) प्ले ऑफचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत असाना CSKला मोठा धक्का बसणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) हा दुखापतीमुळे आयपीएल २०२२च्या उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत जडेजाला ही दुखापत झाली होती आणि त्यामुळेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत त्याला विश्रांती देण्यात आली होती.  चेन्नई सुपर किंग्सची वैद्यकिय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे आणि या पर्वाच्या अखेरपर्यंत बरा होईल, अशी शक्यता कमीच आहे. 

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार जडेजाच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. तो १०० टक्के तंदुरुस्त नसेल तर त्याला न खेळवलेलेच बरे, असा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नईच्या प्ले ऑफच्या आशा फारच कमी आहेत. यंदाच्या पर्वाच्या सुरुवातीला CSK चे कर्णधारपद जडेजाकडे सोपवले, परंतु ते पुन्हा धोनीकडे देण्यात आले. जडेजाला कर्णधारपदाचं दडपण पेलवलं नाही. त्याने या पर्वात १० सामन्यांत ११६ धावा केल्या, तर ५ विकेट्स घेतल्या.  धोनीकडे नेतृत्व येताच चेन्नईची कामगिरी सुधारली आहे, परंतु अव्वल चौघांत त्यांना स्थान मिळणे अवघडच आहे. चेन्नईने उर्वरित तीनही सामने जिंकले तरी त्यांचे १४ गुण होतील.

चेन्नई सुपर किंग्स - ११ सामने, ८ गुणउर्वरित लढती - मुंबई इंडियन्स ( १२ मे) , गुजरात टायटन्स ( १५ मे), राजस्थान रॉयल्स ( २० मे); गतविजेत्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचणे थोडे अवघडच आहे. ते जास्तीतजास्त १४ गुणांची कमाई करू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना RCBचे दोन पराभव, दिल्ली, हैदराबाद व पंजाब यांचा प्रत्येक एक पराभव तोही मोठ्या फरकाने हवा आहे. RCB ने एकही सामना जिंकला तर CSK बाद होईल. 

टॅग्स :आयपीएल २०२२रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App