Join us  

#Boycott_ChennaiSuperKings : एका खेळाडूमुळे झाला राडा; फॅन्सकडून चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) जुन्याच चेहऱ्यांना संघात घेतल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 7:08 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) जुन्याच चेहऱ्यांना संघात घेतल्याचे पाहायला मिळाले. फॅफ ड्यू प्लेसिस व सुरेश रैना वगळले, तर  ड्वेन ब्राव्हो, रॉबीन उथप्पा,  दीपक चहर, अंबाती रायुडू, मिचेल सँटनर हे जूनेच खेळाडू ताफ्यात दिसले. पण, CSK ने निवडलेल्या २५ खेळाडूंपैकी एका खेळाडूमुळे मोठा राडा सुरू झाला आहे आणि फॅन्सनी #Boycott_ChennaiSuperKingsची मागणी सुरू केली आहे.  चेन्नईने त्यांच्या ताफ्यात श्रीलंकेचा गोलंदाज महीश तिक्ष्णा (Maheesh Theekshana) याचा समावेश केला आहे. ७० लाखांच्या किमतीत CSKने त्याला ताफ्यात दाखल केले आहे आणि या गोलंदाजानं आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा ट्वेंटी-२० सामना गाजवताना २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. पण, २१ वर्षीय गोलंदाजामुळेच राडा सुरू झाला आहे.  का होतोय विरोध?चेन्नई सुपर किंग्सने तिक्ष्णाला आपल्या संघात घेतल्याने चेन्नईसह तामिळनाडूचे फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी चेन्नई सुपर किंग्सवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. तिक्ष्णा हा सिंहली वंशातील आहे आणि श्रीलंकेत सिंहलींनकडून तामिळ वंशाच्या लोकांवर अत्याचार केले गेले होते. त्यामुळेच श्रीलंकेत LTTE सारखी संघटना जन्माला आली. तामिळ वंशाच्या  लोकांवर अत्याचार होत असल्यामुळे तामिळनाडूत सिंहली वंशाच्या लोकांवर विरोध केला जातोय.. 

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी),  केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर  ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख). 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२२आयपीएल लिलाव
Open in App