IPL 2023, MS Dhoni Retirement : चेन्नई सुपर किंग्सनेआयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत दोन विजय मिळवले आहेत, तर दोन पराभवाचा सामना केला आहे. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर CSKचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी ( RCB) होणार आहे. IPL2023 ही CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे धोनीच्या प्रत्येक सामन्याला त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत. आजही चिन्नास्वामी स्टेडियमवर धोनीचाच गजर ऐकायला मिळतोय.
मागील दोन पर्वांपासून धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या आणि प्रत्येक वेळी माहीने अफवाचां हा यॉर्कर हॅलिकॉप्टर शॉट्स मारून भिरकावून लावला. पण, यंदा तसं होणं अवघड आहे. धोनी सध्या ४१ वर्षांचा आहे आणि पुढच्या वर्षी तो आयपीएल खेळण्याची शक्यता कमीच आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याचा गुडघा दुखावल्याचे दिसतंय आणि अशात त्याचे पुढे खेळणे अवघडच आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात धोनीने आयपीएल निवृत्तीबाबत स्पष्ट मत मांडले. तो म्हणालेला, अजून निवृत्तीचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ माझ्याकडे आहे. त्याने पुढे हेही म्हटले की आता जर मी काही म्हणालो तर CSKचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना तणाव येईल. ''याबाबतचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. सध्या आम्हाला भरपूर सामने खेळायचे आहेत आणि आता मी काही म्हटलं तर प्रशिक्षकांना टेंशन येईल,''धोनीच्या या विधानानंतर बाजूलाच बसलेल्या फ्लेमिंगला हसू आवरता आले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Chennai Super Kings captain MS Dhoni Drops A Big Hint About Retirement, Reveals If IPL 2023 Will Be His Last Or Not, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.