अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान ३ धावांनी नमवले. राजस्थानने ६ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर राजस्थानने २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या. त्यानंतर त्यांनी चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७२ धावांमध्ये रोखले. चेन्नईचा लोकल बॉय रविचंद्रन अश्विनचा अष्टपैलू खेळ सीएसकेला भारी पडला.
१ चेंडू ५ धावा, स्ट्राइकवर MS धोनी; अखेरच्या क्षणी संदीप शर्माचा तो निर्णय अन् राजस्थानचा विजय
चेन्नईला या पराभवासह आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नईच्या कॅम्पमध्ये अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. अनेक खेळाडू दुखापतीमुळे बेंचवर बसले आहेत, तर काही खेळाडू आयपीएलमधूनच बाहेर झाले आहेत. यातच आता आणखी एक खेळाडू एका आठवडा क्रिकेट खेळू शकणार नाही.
राजस्थान रॉयल्सने मिळवला अव्वल स्थानी कब्जा; लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर, पाहा Points Table!
सामन्यादरम्यान झेल घेताना चेन्नईचा गोलंदाज सिसांडा मगाला याच्या हाताला दुखापत झाली. दीपक चहर २ आठवड्यांसाठी संघाबाहेर आहे, तर सिसांडा मागला देखील किमान १ आठवडा क्रिकेट खेळू शकणार नाही. याशिवाय बेन स्टोक्सही तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहे. चेन्नईच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी म्हणजे धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याची माहिती चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली.
स्टीफन फ्लेमिंग म्हणाला, 'धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. जो तुम्हाला त्याच्याकडे पाहूनही जाणवू शकतो. त्याचा फिटनेस नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. आता त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. तो महान खेळाडू आहे, त्याच्यावर आम्हाला शंका नाही. मात्र धोनीच्या दुखापतीमुळे तो पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत प्रशिक्षकाने काहीही सांगितले नाही.
Web Title: Chennai Super Kings captain MS Dhoni is nursing a knee injury, according to head coach Stephen Fleming
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.