Join us  

IPL 2024: CSK चे संघ व्यवस्थापन कोणत्या कर्णधाराला घाबरते? मायकल हसीचं 'लै भारी' उत्तर

Michael Hussey On Rohit Shamra: रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 11:24 PM

Open in App

IPL 2024 Updates: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांची गणना केली जाते. दोन्हीही संघांनी आतापर्यंत सर्वाधिक पाचवेळा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात दोन्हीही संघ यशस्वी ठरले. पण, आयपीएलच्या सतराव्या हंगामात दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सच्या तर ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे रोहित आणि धोनी हे अद्याप आयपीएल खेळत आहेत. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. 

चेन्नईला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीशी समालोचकांनी संवाद साधला असता त्याने एक मोठे विधान केले. जर तुमच्या संघात महेंद्रसिंग धोनी असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर चाहत्यांचा तुम्हाला पाठिंबा असेलच यात शंका नाही, असे हसीने म्हटले.

हसीचं भारी उत्तर

चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला कोणत्या एका कर्णधाराची भीती वाटते या प्रश्नावर मायकल हसी म्हणाला की, खरं सांगायचं झालं तर यंदाच्या हंगामात कोणीही असा कर्णधार नाही ज्याला आम्ही घाबरतो. फक्त एकच कर्णधार होता ज्याने आम्हाला अंतिम सामन्यात पराभूत केले आहे. पण, आता तो देखील कर्णधार राहिला नाही. तुम्हाला माहितीच असेल मी कोणाबद्दल बोलत आहे. एकूणच हसीने रोहित शर्माचे नाव न घेता त्याचे तोंडभरून कौतुक केले. 

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. तर मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. मुंबईचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे. 

टॅग्स :रोहित शर्मामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सआयपीएल २०२४