Join us  

'बालाजी'च्या चरणी पोहोचली IPL 2023 ट्रॉफी; CSK कडून विशेष पूजा, Video 

CSK take IPL Trophy to Tirupati Temple - चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी ( २९ मे) गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा इंडियन प्रीमिअर लीग ट्रॉफीवर कब्जा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:40 PM

Open in App

CSK take IPL Trophy to Tirupati Temple - चेन्नई सुपर किंग्जने सोमवारी ( २९ मे) गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा इंडियन प्रीमिअर लीग ट्रॉफीवर कब्जा केला. मंगळवारी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत रंगलेल्या या सामन्यात CSK ने गतविजेत्या गुजरात टायटन्सवर रोमहर्षक विजय मिळवला. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर ६,४ मारून हा विजय मिळवून दिला. मंगळवारी CSK व्यवस्थापन आयपीएल ट्रॉफी घेऊन चेन्नईच्या मंदिरात गेले. येथे त्यांनी देवाचा आशीर्वाद घेत आयपीएल ट्रॉफीची पूजा केली.  

चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन पूजेला उपस्थित होते. सीएसकेने २९ मे रोजी आयपीएलचे विजेतेपद जिंकले, जे पावसामुळे राखीव दिवशी खेळले गेले. अंतिम फेरीनंतर आयपीएल ट्रॉफी चेन्नईला नेण्यात आली. मंगळवारी एन श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत सीएसके व्यवस्थापन आयपीएल ट्रॉफीसह येथील मंदिरात पोहोचले. मंदिरात देवासमोर आयपीएल ट्रॉफी ठेवून विशेष पूजा करण्यात आली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले. यासह CSK ने IPL मध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. हा एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल सीझन असल्याचे मानले जात होते, परंतु अंतिम सामन्यानंतर धोनीने या अफवेला पूर्णविराम दिला. पुढील वर्षी आयपीएल खेळणार असल्याचे धोनीने स्पष्ट केले. 

सामन्यानंतर धोनी म्हणाला, “आता जे वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे मला धन्यवाद म्हणणे आणि निवृत्ती घेणे सोपे आहे, परंतु पुढील ९ महिने पुढील हंगामाची तयारी करणे कठीण आहे. या हंगामात मला चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे, मग ते स्टेडियम कोणतेही असो, ते अतुलनीय आहे. पुढच्या हंगामात खेळून मी माझ्या चाहत्यांना भेट देईन.''

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्स
Open in App