इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल)च्या 13व्या मोसमासाठी दुबईत दाखल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ससमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनापाठोपाठ अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यानंही वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची संख्या वाढल्यामुळे संघातील बऱ्याच खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळेच रैनानं माघार घेतल्याचीही चर्चा होती. अशात हरभजनलाही हीच भीती सतावत होती आणि अखेर त्यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. वैैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे भज्जीनं सांगितलं.
चेन्नईच्या संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू असलेल्या भज्जीनं माघार घेतल्यानं धोनीची चिंता वाढली आहे. 2018मध्ये भज्जी चेन्नई संघाचा सदस्य झाला. त्यानं 2018 व 2019 च्या मोसमात 24 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये एकूण त्यानं 160 सामन्यांत 150 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 2020साठी चेन्नई सुपर किंग्सनं चेन्नईत आयोजित केलेल्या सराव शिबिरातही भज्जी सहभागी झाला नव्हता. तो मंगळवारी दुबईत दाखल होणं, अपेक्षित होतं. मात्र, त्याची अनुपस्थिती चर्चेचं कारण ठरली होती. त्यात शुक्रवारी भज्जीनं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे वृत्त चर्चिले गेले. PTIला भज्जीनं हे वृत्त खरं असल्याचे सांगितले.
CSKनं व्यवस्थापनाला परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले होते
ANI ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने अजून संघ व्यवस्थापनाला अधिकृतपणे कळवलेलं नाही आणि भज्जीनं माघार घेतल्यास संघाला तयार राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. ''त्याने अजूनही अधिकृतपणे काहीच कळवलेलं नाही. आज रात्रीपर्यंत किंवा उद्या आम्हाला त्याचं उत्तर अपेक्षित आहे. पण, त्यानं न खेळण्याचा निर्णय घेतल्यास, संघ व्यवस्थापनाला त्या परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे,'' असे सूत्रांनी सांगितले.
Read in English
Web Title: Chennai Super Kings' Harbhajan Singh will miss the entire IPL 2020 for "personal reasons"
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.