Chennai Super Kings’s training camp starts in Surat - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक BCCI ने रविवारी जाहीर केले. २६ मार्चला गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि गत उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) यांच्यात सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी BCCIने यंदाची आयपीएल एकाच राज्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी बीसीसीआयने साखळी फेरीच्या ७० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यापैकी ५५ सामने मुंबई, नवी मुंबईत होतील, तर पुण्यात १५ सामने होतील. चेन्नई सुपर किंग्सने नेहमीप्रमाणे सर्वात आधी आयपीएल साठीच्या सरावाला सुरुवात केली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील CSKचा ताफा रविवारी सुरतमध्ये दाखल झाला आणि धोनीची झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती.
सरावासाठी सुरतचीच का केली निवड?
बीसीसीआयने आयपीएल २०२२च्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात खेळवण्याचे जाहीर केल्यानंतर धोनीनं CSK चे सराव शिबीर चेन्नईहून सुरतला हलवण्यास सांगितले. चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलआधी २० दिवस सुरत येथे सराव करणार आहे आणि धोनीच्या या निर्णयामागे मास्टर मुव्ह आहे. सुरतच्या लालभाई काँट्रॅक्टर स्टेडियमवर CSK चे खेळाडू सराव करणार आहेत. नुकतेच या स्टेडियमवच्या खेळपट्टी तयार करण्यात आल्या आणि त्यासाठी मुंबईच्या मातीचा वापर केला गेला आहे. धोनीला हे समजताच त्याने CSKचा ट्रेनिंक कॅम्प चेन्नईहून सुरत येथे हलवला.
''महेंद्रसिंग धोनी, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्टार्स या सराव सत्रात सहभागी होणार आहेत. सुरतच्या या स्टेडियमसाठी मुंबईच्या मातीचा वापर करण्यात आला आहे आणि त्यामुळे या फ्रँचायझीने येथे सराव करण्याचा निर्णय घेतला,''असे सुरत जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव नैनेश देसाई यांनी सांगितले.
चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण वेळापत्रक
- २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ३१ मार्च - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ३ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ९ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- १२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १७ एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २१ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २५ एप्रिल - पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १ मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ४ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ८ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १५ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- २० मे - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).