Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ( IPL 2021) आजपासून सुरूवात होत आहे. अवघ्या काही तासांत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai) यांच्यातल्या उद्धाटनीय सामन्याला सुरूवात होईल. पण, चर्चा सुरू झालीय ती महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings)... आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी CSKचा प्रमुख गोलंदाज जोश हेझलवूड ( Josh Hazelwood) यानं बायो-बबलला कंटाळून आयपीएलमधून माघार घेतली. त्यात दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुंगी एनगिडी ( Lungi Ngidi) क्वारंटाईनमध्ये आहे. अशात CSKकडे अनुभवी गोलंदाज नव्हता, परंतु शुक्रवारी त्यांनी ही उणीव भरून काढली.
CSKनं ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ ( Jason Behrendorff) याला हेझलवूडचा रिप्लेसमेंट म्हणून करारबद्ध केलं आहे. बेहरनडॉर्फ यानं ११ वन डे व ७ ट्वेंटी-२० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०१९च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians) खेळला होता. पाच सामन्यांत त्याच्या नावावर पाच विकेट्स आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. MI vs RCB, Match Preview: कोहलीसमोर मुंबईचं 'विराट' आव्हान; कोण जिंकणार?
चेन्नई सुपर किंग्सचे वेळापत्रक१० एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई१६ एप्रिल, ७.३० वा.पासून - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई१९ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई२१ एप्रिल, ७.३० वा.पासून - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई२५ एप्रिल, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई२८ एप्रिल, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली१ मे, ७.३० वा.पासून - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली५ मे, ७.३० वा.पासून - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली७ मे, ७.३० वा.पासून - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली९ मे, ३.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, बंगळुरू१२ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू१६ मे, ७.३० वा.पासून - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू२१ मे, ७.३० वा.पासून - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता२३ मे, ७.३० वा.पासून - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता