जयपूर : राजस्थानच्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या चेंडूपर्यंत लढा द्यावा लागला. शेवटची ओव्हर नाट्यमय ठरली. कधी नव्हे तो कॅप्टन कूल महेंद्रसिग धोनी मैदानात गेला होता. यानंतर शेवटच्या चेंडूवर एम सॅम्टनरने षटकार खेचत चेन्नईला विजय मिळवून दिला.
राजस्थानने दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात शेन वॉटसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात सुरेश रैना (4) धावचीत झाला. चेन्नईचा संघ या धक्क्यांमधून सावरण्यापूर्वीच फाफ डू प्लेसिस 7 आणि केदार जाधव एक धाव काढून बाद झाला.
मात्र संघाची अवस्था 4 बाद 24 अशी झालेली असताना कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि अंबाती रायुडू यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. यानंतर महेंद्र सिंह धोनीने 40 चेंडून 52 धावा करत अर्धशतक पूर्ण केले. अंबाती रायडू 57 धावांवार बाद झाला. यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये धोनीही 58 रन बनवत क्लीन बोल्ड झाला. यानंतर शेवटच्या चेंडूवर एम सॅम्टनरने षटकार खेचत चेन्नईला विजय मिळवून दिला.
आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सुरू असलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचे आव्हान ठेवले आहे. दमदार सुरुवातीनंतर चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर मधली फळी कोलमडल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचे राजस्थानचे स्वप्न भंगले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी राजस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र रहाणे (14) आणि जोस बटलर (23) धावा काढून बाद झाल्यानंतर राजस्थानच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतील संजू सॅमसन (6), राहुल त्रिपाठी (10) आणि स्टीव्हन स्मिथ (15) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
त्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्सने रियान परागच्या साथीने राजस्थानला शंभरीपार पोहोचवले. पण अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात रियान पराग (16) आणि बेन स्टोक्स (28) बाद झाले. शेवटी श्रेयस गोपाळ ( नाबाद 19) आणि जोफ्रा आर्चर ( नाबाद 13) यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला.
चेन्नईकडून रवींद्र जडेजा, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन तर मिचेल सेंटनरले एक बळी टिपला.
Web Title: Chennai's victory over the last ball hit sixes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.