चेन्नई : अखेरच्या साखळी सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स संघाला आयपीएलच्या पहिल्या
क्वालिफायरमध्ये मंगळवारी आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. चेन्नई संघाला गृहमैदानावर चमकदार कामगिरीचा विश्वास आहे.
साखळी फेरीनंतर आता आयपीएलमध्ये प्ले-आॅफ लढतींना प्रारंभ होत आहे. चेन्नई व मुंबई पहिल्या क्वालिफायरमध्ये आमने-सामने असतील. या लढतीतील विजेता संघ १२ मे रोजी खेळल्या जाणाºया अंतिम लढतीसाठी पात्र ठरेल.
उभय संघांनी प्रत्येकी तीनवेळा जेतेपदाचा मान मिळविला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने दमदार सुरुवात केली, पण मधल्या कालावधीत त्यांनी लय गमावली. त्यांना मोहालीमध्ये अखेरच्या साखळी लढतीत पंजाबने ६ गडी राखून पराभूत केले.
चेन्नईसाठी सुखावणारी बाब म्हणजे ही लढत त्यांच्या गृहमैदानावर होत आहे.
या मैदानावर चेन्नईची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. चेन्नईने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सातपैकी सहा सामने जिंकले आहे. त्याचा त्यांना लाभ मिळेल. पराभूत संघ १० मे रोजी दुसरा क्वालिफायर खेळेल.
(वृत्तसंस्था)
मुंबईचे पारडे जड, डीकॉक, हार्दिकला रोखण्याचे चेन्नईपुढे आव्हान
साखळी फेरीत चेन्नईच्या आघाडीच्या फळीने टप्प्याटप्प्यात चांगली कामगिरी केली. त्यांना मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळ करावा लागेल. मुंबईतर्फे जसप्रीत बुमराह १७, लसिथ मलिंगा १५, हार्दिक पांड्या १४, कृणाल पांड्या व राहुल चहर यांनी प्रत्येकी १० बळी घेतले आहेत. चेन्नई संघाची फलंदाजीची भिस्त कर्णधार धोनीवर अवलंबून आहे.त्याने १२ सामन्यात ३ अर्धशतकांसह ३६८ धावा फटकावल्या आहेत.
त्यासोबतच शेन वॉटसन व सुरेश रैना यांना चांगली कामगिरी करावी लागेल. कारण अंबाती रायुडू लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. चेन्नईला केदार जाधवची उणीव भासेल. पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्या स्थानी मुरली विजय किंवा ध्रुव शोरे यांना संधी मिळू शकते. यंदाच्या मोसमात गोलंदाजी चेन्नईची जमेची बाजू ठरली आहे.
कारण मुंबईचे क्विंटन डिकाक (४९२), रोहित शर्मा (३८६) आणि हार्दिक पांड्या (३८०) शानदार फॉर्मात आहेत. किरोन पोलार्डला त्याचा दिवस असेल त्या दिवशी रोखणे कठीण असते. अशास्थितीत दीपक चहरवर सुरुवातीला बळी घेण्याची जबाबदारी राहील. उभय संघांदरम्यान यंदाच्या मोसमात खेळल्या गेलेल्या लढतींमध्ये दोन्हीवेळी मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकाक, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, कीरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मिशेल मैक्लीनागन, मयंक मार्कंडेय, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, अनमोलप्रीत सिंह, सिद्धेश लाड, अंकुल राय, एविन लुईस, पंकज जयस्वाल, बेन कटिंग, ईशान किशन, आदित्य तारे, रसिख सलाम, बरिंदर शरण, जयंत यादव, बूरान हेंडरिक्स, लसिथ मलिंगा.
चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, रितुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिशेल सँटनेर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के.एम. आसिफ, दीपक चहर, एन.जगदीशन, स्कॉट के.
Web Title: Chennai's victory over Mumbai against home advantage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.