बुद्धिबळानेच शिकवला संयम; युजवेंद्र चहल अनेक वर्षांनंतर कुटुंबासोबत खेळला

लॉकडाऊनमुळे आपल्या कुटुंबासमवेत राहणाºया चहलने भारताकडून ५२ एकदिवसीय सामने व ४२ टी-२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 04:46 AM2020-04-07T04:46:19+5:302020-04-07T04:50:55+5:30

whatsapp join usJoin us
chess teaches patience; Yuzvendra Chahal played with his family many years | बुद्धिबळानेच शिकवला संयम; युजवेंद्र चहल अनेक वर्षांनंतर कुटुंबासोबत खेळला

बुद्धिबळानेच शिकवला संयम; युजवेंद्र चहल अनेक वर्षांनंतर कुटुंबासोबत खेळला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई: क्रिकेटच्या मैदानावरील सयंम हा बुद्धिबळामुळेच आला असल्याचे मत बुद्धिबळ मास्टर असलेला गोलंदाज क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याने एका आॅनलाइन कार्यक्रमांतर्गत व्यक्त केले. चहल म्हणाला, बुद्धिबळाने मला सयंम राखायला शिकवले. क्रिकेटमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करत असतानाही कधी कधी तुम्हाला बळी मिळत नाहीत. एखाद्या कसोटीत तुम्ही दिवसभर चांगली गोलंदाजी करता मात्र तुम्हाला बळी मिळाला नाही तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला गोलंदाजी करावीच लागते. यासाठी तुमच्याकडे सयंम असायला हवा. बुद्धिबळाने यात मला खूप मदत केली आहे. मी फलंदाज बाद करण्यासाठी सयंम ठेवायला शिकलो. ’


लॉकडाऊनमुळे आपल्या कुटुंबासमवेत राहणाºया चहलने भारताकडून ५२ एकदिवसीय सामने व ४२ टी-२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. तो म्हणाला,‘ मला कुटुंबासमवेत जास्त वेळ देता येत नव्हता. अनेक वर्षांनतर मी घरात आहे. मी माझ्या कुटुंबासमवेत असून हा एक सुंदर अनुभव आहे. मी दररोज उशिरा झोपतो व उशिराच उठतो.’ चहल शेन वॉर्नला आपला आदर्श मानतो. जेव्हा शक्य असते तेंव्हा तो आॅनलाइन बुद्धिबळ खेळतो. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाच फाफ डू प्लेसिस याचा बळी आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ठ असल्याचे त्याचे मत आहे. तो म्हणाला,‘ ती माझी पहिलीच विश्वचषक स्पर्धा होती. फाफचा बळी माझ्यासाठी सर्वोत्कृष्ठ होता. मी गोलंदाजी करताना अनेक योजना आखत असतो. मी याबाबत यष्टीरक्षकाशीही चर्चा करतो. मी माहिला नेहमी सांगायचो की मी कशी गोलंदाजी करणार आहे. ’
चहलने कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लोकांना आपल्या घरातच रहावे असे आवाहन केले आहे. तो म्हणाला,‘ तुम्ही आपापल्या घरातच रहा. असे करुन तुम्ही हिरो बनू शकता. कोरोनाविरुद्ध आपणा सर्वांना एकत्रित लढा द्यायचा आहे. घरात राहून तुम्ही वाचन करा, नृत्य शिका, जेवन करायला शिका. या काळात तुम्ही नवनवीन गोष्टी करायला शिकू शकता. (वृत्तसंस्था)
राष्टÑीय विजेता बुद्धिबळपटू आहे चहल!
चहल हा १२ वर्षाआतील राष्टÑीय बुद्धिबळ चॅम्पियन ठरला होता. त्याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावरही त्याचे नाव आहे. त्याचे इलओ रेटिंग १९५६ आहे. अजुनसुद्धा फावला वेळ मिळाला की तो सहकाऱ्यांसोबत बुध्दिबळ खेळतो.
चहल म्हणाला, ‘मला बुद्धिबळ किंवा क्रिकेट या पैकी एकाची निवड करायची होती. मी माझ्या वडिलांशी यावर चर्चा केली. त्यांनी तुला जे आवडते ते कर असे सांगितल्यावर मी क्रिकेटची निवड केली कारण मला क्रिकेट जास्त आवडत होते’ कोरोनाच्या काळात लोकांना घरातच रहायचे आवाहन त्याने केले आहे.

Web Title: chess teaches patience; Yuzvendra Chahal played with his family many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.