Chetan Sharma Sting Operation: भारतीय क्रिकेट संघाच्या संघनिवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमधील धक्कादायक खुलाशांनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन शर्मा यांच्या स्टींग ऑपरेशन नंतर आता त्यांचे पद जाणार अशी चर्चा रंगली आहे. याबाबत BCCI ने चेतन शर्मा यांच्याशी बोलून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे असेही सांगितले जात आहे. चेतन शर्माने झी न्यूजच्या स्टिंगमध्ये निवड समितीची प्रक्रिया, कोहली-गांगुली वाद, खेळाडूंचा फिटनेस यासह अनेक मुद्द्यांवर गौप्यस्फोट केले. त्यामुळे BCCI आणि भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली असून चेतन शर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तशातच आता BCCI कडून महत्त्वाचे विधान आले आहे.
BCCI लवकरच अधिकृत निवेदन जारी करणार!
आता BCCI चे अधिकारी झी न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनबाबत बोलण्यास पुढे येण्याचे टाळत आहेत. स्टिंगवर, जेव्हा झी न्यूजला बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्याशी बोलायचे होते तेव्हा त्यांनी एवढेच सांगितले की बीसीसीआय लवकरच याबाबत अधिकृत निवेदन जारी करेल. यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. पुन्हा एकदा शेलार यांच्याकडून अतिरिक्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, आशिष शेलार यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, BCCI निवेदन जारी करणार म्हणजेच चेतन शर्मा यांच्यावर मोठी कारवाई केली जाऊ शकते अशी शक्यता क्रिकेट प्रशासनात काम केलेले काही जाणकार व्यक्त करत आहेत.
स्टिंगनंतर जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली
चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये विविध खुलासे केल्याने केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. चेतन शर्माने झी मीडियाच्या छुप्या कॅमेऱ्यासमोर खुलासा केला की, टीम इंडियातील खेळाडू इंजेक्शन घेऊन फिटनेस प्रमाणपत्र मिळवतात. यासोबतच चेतन शर्मा यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड आणि ड्रॉप करण्याबाबतही खुलासे केले. यासोबतच त्यांनी BCCI चे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादावरही भाष्य केले.
दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणाची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि प्रमुख हे बीसीसीआयशी करारबद्ध असतात. त्यांना जाहीरपणे संघाशी संबंधित गोष्टी बोलण्याची परवानगी नसते. या प्रकरणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, चेतन शर्मांचं भवितव्य काय असेल हे आता बीसीसीआयचे सचिव जय शाह ठरवतील. या गौप्यस्फोटांनंतर टी-२० कर्णधार हार्दिक पांड्या आणि वनडे व कसोटी कर्णधार रोहित शर्मा हे चेतन शर्मांसोबत संघनिवड करण्यासाठी बसतील का? हाच प्रश्न आहे.
Web Title: chetan sharma sting operation bcci to talk may take action to release press note setback to India cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.