Chetan Sharma Sting Operation: विराट खोटे का बोलला...; गांगुली-विराट-रोहित वादावर चेतन शर्मांचा मोठा खुलासा

आम्ही सगळे तिथे होतो, गांगुलीला कोहली आवडत नव्हता... टीम इंडियात स्टिंग ऑपरेशनचे वादळ घुसणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 09:36 PM2023-02-14T21:36:51+5:302023-02-14T21:37:25+5:30

whatsapp join usJoin us
Chetan Sharma Sting Operation: Why did Virat lie on captanship; Chetan Sharma's big revelation on the Saurav Ganguly-kohli-Rohit Sharma controversy bcci | Chetan Sharma Sting Operation: विराट खोटे का बोलला...; गांगुली-विराट-रोहित वादावर चेतन शर्मांचा मोठा खुलासा

Chetan Sharma Sting Operation: विराट खोटे का बोलला...; गांगुली-विराट-रोहित वादावर चेतन शर्मांचा मोठा खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट टीमबाबत खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा दुसरा तिसरा कोणी नाही तर एकेकाळी टीम इंडियाचे खंदे शिलेदार राहिलेल्या चेतन शर्मा यांनी केला आहे. भारतीय संघातील खेळाडू डोपिंग टेस्टपासून वाचण्यासाठी, फिट दाखविण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे चेतन शर्मा हे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्षही आहेत. शर्मा यांनी विराट कोहली आणि गांगुलीमधील मतभेदांवरही चर्चा केली आहे. कदाचित झी न्यूजने केलेले स्टिंग ऑपरेशन चेतन शर्मांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. 

टीम इंडियाचे खेळाडू पेन किलर घेतात का असे विचारले असता "नाही! मी इंजेक्शन्सबद्दल बोलतोय. ते पेन-किलर घेतल्यास ते डोपिंगमध्ये येईल. टीम इंडियाच्या खेळाडूंना माहिती आहे की कोणते इंजेक्शन अँटी-डोपिंगमध्ये येतात.", असे शर्मा यांनी म्हटले आहे. 

Chetan Sharma Sting Operation: टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन खेळतात; चेतन शर्मांचा स्टिंग ऑपरेशनमध्ये गौप्यस्फोट

विराट- गांगुली वादावर...
IND vs SA मालिकेपूर्वीची पत्रकार परिषदेत विराटने तो कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. 1.30 तास आधी त्याला याबाबत सांगण्यात आले होते, असे विराट म्हणाला होता. त्याला सौरवकडे परत यायचे होते म्हणूनच त्याने ते केले असावे, असे चेतन शर्मा म्हणाले. तो कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेला जाणार होता. पत्रकार परिषद संघाबद्दल होती तिथे हा विषय आणण्याची गरज नव्हती. विराट खोटे का बोलला हे आजपर्यंत आम्हाला माहिती नाही. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे... त्यात वाद झाला... बोर्ड विरुद्ध खेळाडू, असा खुलासा शर्मा यांनी केला. 

बीसीसीआयच्या अध्यक्षांमुळे कर्णधारपद गमावल्याचा समज विराटने करून घेतला. निवड समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये 9 लोक होते. गांगुलीने त्याला 'एकदा विचार कर' असे सांगितले होते. मला वाटते की कोहलीने ते ऐकले नाही, मी आणि इतर सर्व निवडकर्ते, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसह इतर 9 जण तिथे होतो - कदाचित कोहलीने त्याचे ऐकले नसेल, असे आम्हालाही वाटले असे शर्मा म्हणाले. 

गांगुलीने रोहितची बाजू घेतली नाही पण त्याला विराट कधीच आवडला नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कोणतीही लढाई नाही पण अहंकार आहे. दोघेही अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासारख्या बड्या फिल्म स्टार्ससारखे आहेत, असे म्हणता येईल, असेही शर्मा म्हणाले. 


 

Web Title: Chetan Sharma Sting Operation: Why did Virat lie on captanship; Chetan Sharma's big revelation on the Saurav Ganguly-kohli-Rohit Sharma controversy bcci

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.