BCCI Central Contract, Pujara-Rahane: भारतीय संघाचे दोन सिनिअर खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या खराब फॉर्मात आहेत. दोघांच्याही बॅटमधून धावा निघताना दिसत नाहीत. त्याचाच परिणाम आता येत्या श्रीलंका मालिकेवर होऊ शकतो आणि दोघांचीही संघातून बाहेर केलं जाऊ शकतं. यासोबतच आता दोघांसोबतच्या बीसीसीआयनं केलेल्या वार्षिक करारावरही काही परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, येत्या दिवसात बीसीसीआय़कडून खेळाडूंसोबतच्या वार्षिक कराराची घोषणा केली जाऊ शकते. यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे यांच्यासोबतच्या करारावर सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण सध्याच्या करारानुसार दोघांचा 'ग्रूप-ए'मध्ये समावेश आहे. दोघंही फॉर्मात नसल्यानं त्यांच्या संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. अशातच दोघांच्या वार्षिक करारावरही परिणाम होऊ शकतो.
सध्या कोण कोणत्या गटात?
सध्याच्या करारानुसार चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे 'ए-ग्रेड'मध्ये आहेत. म्हणजेच त्यांना वार्षिक ५ कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्र्रॅक्टला एकूण चार गटांत विभागलं आहे. यात A+, A, B आणि C असे गट आहेत. A+ साठी ७ कोटी, A गटासाठी ५ कोटी, B गटासाठी ३ कोटी आणि c गटासाठी १ कोटी रुपये वार्षिक मानधन दिलं जातं.
ग्रेड A+ : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
ग्रेड A : रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंड्या
ग्रेड B : रिद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मयांक अग्रवाल
ग्रेड C : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, शुबमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज
Web Title: cheteshwar pujara ajinkya rahane bcci central contract team india for salary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.