ICC Test batsman ranking: आयसीसीनं शनिववारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या व मार्नस लाबुशेन तिसऱ्या स्थानावर आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांची बढती झाली आहे. 'या' गंभीर आजाराशी लढतोय सौरव गांगुली, वाचा किती घातक आहे Triple Vessel Disease
आयसीसीनं जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीनुसार केन ९१९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील द्विशतकानं केनला प्रथमच आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचवले. स्मिथनं टीम इंडियाविरुद्ध सिडनी कसोटीत शतकी खेळी केली आणि त्यामुळे तो ८९१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. लाबुशेन ८७८ गुणांसह तिसऱ्या, तर विराट ८६२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे एकेक स्थान वर सरकले आहेत. पुजारा ७६० गुणांसह सहाव्या, तर अजिंक्य ७४८ गुणांसह आठव्या स्थानी आला आहे. टॉप टेन फलंदाजांमध्ये भारताचे तीन खेळाडू आहेत. IPL 2021 : १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात पाच भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी काट मारणार!
गोलंदाजांमध्ये आर अश्विन व जसप्रीत बुमराह अनुक्रमे ८व्या व ९व्या क्रमांकावर आहेत.