CHETESHWAR PUJARA scored 17th Double hundred (Marathi News) : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चेतेश्वर पुजाराने Ranji Tropy 2024 च्या पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे १७वे द्विशतक ठरले आणि आशियाई व सध्या खेळत असलेल्या कोणत्याची फलंदाजांपैकी ही सर्वाधिक द्विशतकं ठरली आहेत. पुजाराची आजची खेळी पाहून नेटिझन्सनी BCCI ला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिका भारताने १-१ अशी बरोबरीत सोडवली, परंतु पहिल्या सामन्यात मधल्या फळीच्या अपयशाने संघाची डोकेदुखी वाढवलेली दिसली.
सौराष्ट्राच्या चिराग जानीने पाच विकेट्स घेतल्या आणि झारखंडचा पहिला डाव १४२ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकाच्या जोरावर सौराष्ट्रने मजबूत आघाडी घेतली आहे. एच देसाई ( ८५) व शेल्डन जॅक्सन ( ५४) यांच्या अर्धशतकाने सौराष्ट्रला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा व ए वसावडा यांनी दमदार कामगिरी केली. वसावडा १७१ चेंडूंत ६८ धावांवर माघारी परतला. पण, पुजाराने ३५२ चेंडूंचा सामना करताना २९ चौकारांच्या मदतीने नाबाद २३६ धावा केल्या आहेत. प्रेरक मंडक १६२ चेंडूंत ९९ धावांवर खेळतोय आणि सौराष्ट्रने १५३ षटकांत ४ बाद ५६६ धावा करून ४२४ धावांची आघाडी घेतली आहे.
- रणजी करंडक स्पर्धेत राजकोट येथे सर्वाधिक ७ द्विशतकाचा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावावर आहे. त्यानंतर रवींद्र जडेजा ( ३) याचा क्रमांक येतो.
- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक सर डॉन ब्रॅडमन ( ३७) आणि वॅली हॅमोंड ( ३६) यांनी झळकावली आहे. त्यानंतर एलियास हेड्रेन ( २२), एच सटक्लिफ, मार्क रामप्रकार आणि चेतश्वर पुजारा ( प्रत्येकी १७) यांचा क्रमांक येतो.
- चेतेश्वर पुजाराचे आजचे १७वे द्विशतक हे आशियाई खेळाडूंमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक ठरले.
- रणजी करंडक स्पर्धेत पारस डोग्रा यांनी सर्वाधिक ९ द्विशतकं झळकावली आहेत आणि त्यानंतर चेतेश्वर पुजाराचा ( ८) क्रमांक येतो. पुजाराने आज अभिमन मुकूंद व अजय शर्मा ( प्रत्येकी ७ ) यांना मागे टाकले.
Web Title: CHETESHWAR PUJARA IS BACK, scored 17th Double hundred in the first match of Ranji Trophy 2024, dropped from the Indian team but returning in style with the bat for Saurashtra
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.