लंडन : भारताच्या अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा संघात पुनरागमन करण्यासह आपले स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी तो सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे. एकीकडे भारतात आयपीएलचा धडाका सुरू असताना, दुसरीकडे पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट गाजवत आहे. पुजाराने तब्बल शंभर वर्षे जुना विक्रम मोडला.
पुजाराने ससेक्सकडून पाच डावांमध्ये दोन द्विशतके ठोकताना एक शतकही झळकावले. शनिवारी त्याने डरहॅमविरुद्ध द्विशतक ठोकत नवानगरचे महाराजा रणजितसिंग यांच्या शंभर वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ द्विशतके झळकावणारा पुजारा केवळ दुसरा भारतीय ठरला.
अझरुद्दीनलाही गाठले! कौंटी क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावण्याच्या मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशीही पुजाराने बरोबरी केली. अझरुद्दीनने डर्बिशायरकडून खेळताना १९९१ मध्ये लिचेस्टरशायरविरुद्ध २१२ धावा, तर १९९४ मध्ये डरहॅमविरुद्ध २०५ धावा केल्या होत्या.