डोंबिवली: साईश्रद्धा क्रिकेट संघ-खंबाळपाडा यांच्या माध्यमातून स्व. शिवाजी शेलार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी झाला, त्यात चिकनघरच्या जय म्हसोबा क्रिकेट संघाने बाजी मारली. देसाई येथील क्रिकेट संघाला त्यांनी पराभूत केले.
चिकनघरच्या विजेत्या संघासमोर देसाई संघाने 56 धावांचे आव्हान ठेवले होते, 4 ओव्हरमध्ये चिकनघर संघाने ते आव्हान पार केले. 30 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत या स्पर्धा ह.भ.प.सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात भरवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील 48 क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहबाग घेतला होता. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला 2 लाख रुपये आणि चषक देण्यात आला. द्वितीय पारितोषिक 1 लाख, तर तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50 हजारांचे देण्यात आले होते. मालिकावीर संघाला एक दुचाकी बक्षीस म्हणन जाहीर करण्यात आली होती.नगरसेवक साई शेलार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष होते. सोमवारीच कल्याण-डोंबिवली महानहरपालिकेतील भाजप-शिवसेना या पक्षांच्या नगरसेवकांचे संघ खेळणार होते. ठरल्यानुसार भाजपचा संघ तयारीत होता, परंतु शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा कल्याणमध्ये दौरा असल्याने त्या पक्षाचे नगरसेवक खेळण्यासाठी येवू शकले नाहीत. त्यामुळे तो सामना ऐनवेळी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. विजेत्या संघाला भाजपचे नगरसेवक महेश पाटील, काँग्रेस नेते गंगाराम शेलार, माजी नगरसेविका शेलार, नगरसेवक साई शेलार यांनी धनादेश व चषक देऊन सन्मानित केले.