मुंबई : सध्याच्या घडीला साऱ्या खेळाडूंनी वेध लागले आहेत ते आशियाई क्रीडा स्पर्धेचे. या स्पर्धेत भारताला सर्वात जास्त अपेक्षा आहेत त्या कुस्तीपटूंकडून. भारताची ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक या स्पर्धेसाठी सज्ज आहे. या स्पर्धेत मला चीन आणि जपानच्या कुस्तीपटूंकडून मोठे आव्हान मिळेल, असे मत साक्षीने व्यक्त केले आहे.
पदकापेक्षा जिंकणे महत्त्वाचेएखाद्या स्पर्धेत खेळत असताना आम्ही पदकाचा किंवा पदकाच्या रंगाचा विचार करत नाही. प्रत्येक स्पर्धेतील सामने जिंकता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. स्पर्धा सुरुच असतात, पण आम्ही वर्षभर सराव करतच असतो. फक्त काही महत्त्वाच्या स्पर्धांसाठी आन्ही विशेष तयारी करतो, असे साक्षी म्हणाली.
प्रत्येक स्पर्धेत तुम्ही पदक पटकावू शकत नाहीपदक पटकावल्यावर तुमच्याकडून अपेक्षा वाढत असतात. या अपेक्षांचे काही वेळेला दडपणही येते. कारण तुम्ही प्रत्येक स्पर्धेत पदक पटकावायला हवे, अशी चाहत्यांची अपेक्षा असते आणि प्रत्येक स्पर्धेत तुम्ही पदक पटकावू शकत नाही, असे साक्षी म्हणाली.