मुंबई : हेतुसंबंध जपण्याच्या मुद्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गागुलीसह अन्य माजी खेळाडूंना खडसावलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) फ्रँचायझीमधील भूमिका सांभाळा किंवा टीव्हीवर समालोचन करा, असा फतवा बीसीसीआयनं या खेळाडूंना धाडला आहे. सर्वोच्च न्यायायलाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं हा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. तरीही अनेक खेळाडू त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळाले.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे अनेक माजी खेळाडू समालोचन करत आहेत. त्यात तेंडुलकर, गांगुली, हरभजन सिंग, व्हि व्हि एस लक्ष्मण यांचा समावेश आहे. तेंडुलकर हा मुंबई इंडियन्ससह गेली अनेक वर्ष संलग्न आहे, तर गांगुलीहा दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार आहे. शिवाय गांगुली हा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही विराजमान आहे. दुसरीकडे हरभजन हा चेन्नई सुपर किंग्सकडू अजूनही खेळत आहे, तर लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा मेंटॉर आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयचे शिस्तपालन समितीचे अधिकारी डी के जैन यांनी हेतुसंबंध जपण्याच्या मुद्यावरून तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी या खेळाडूंच्या दुहेरी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वी याच मुद्यावरून राहुल द्रविडनं दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या मेंटॉरची जबाबदारी सोडली होती. त्यानं भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते.
पाकिस्तानचा कर्णधार संभ्रमात, संघात कल्पकतेचा अभाव; तेंडुलकरचं मतभारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताचा हा पाकिस्तानवरील सातवा विजय ठरला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर चहुबाजूनं टीका होत आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्यात उडी घेतली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद ही संभ्रमीत व्यक्ती आहे आणि या संघात कल्पकतेचा अभाव आहे, असे मत तेंडुलकरने व्यक्त केले. तेंडुलकर म्हणाला,''सर्फराज संभ्रमात होता, वाहब रियाज गोलंदाजी करताना त्यानं शॉर्ट मिड-विकेटवर खेळाडू ठेवला होता, तर शाबाद खान आल्यावर स्लीप ठेवायचा. त्याचाच काही कळत नव्हतं, काय करावं."