Chris Cooke 113 Runs in 41 balls: गोलंदाज येत राहिले, तो त्यांचा चोप देत राहिला. त्याच्या बॅटने गोलंदाजांचा असा काही समाचार घेतला की मैदानाचा एकही कोपरा त्याने सोडला नाही. तो बाद होत नसल्यामुळे गोलंदाजांची अवस्था अक्षरश: बिकट झाली. एकीकडे फलंदाज बाद होत राहिले पण त्याने जिद्द सोडली नाही. तो विकेटवर नाबाद राहिला आणि त्याने मैदानात तुफानी बॅटिंग करत T20 कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले. हा पराक्रम केला इंग्लंडच्या 37 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ख्रिस कुकने. त्याच्या दमदार खेळीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
41 चेंडूत 7 षटकार, 12 चौकार, 113 धावा
ख्रिस कूकने क्रीजवर येताच आपल्या संघाला आधार देणारी खेळी केली. त्याच्या समोर उभ्या असलेल्या मिडलसेक्स संघाच्या गोलंदाजांवर त्याने अक्षरश: हल्ला चढवला. त्याने 41 चेंडूत 113 धावा केल्या. 275 च्या स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. त्याच्या शतकी खेळीमुळे ग्लॅमॉर्गनने 20 षटकांत 3 गडी गमावून 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात मिडलसेक्स संघाला 29 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाहा कुकची तुफानी बॅटिंग...
कुकचे पहिले शतक
ख्रिसने जे केले ते इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या तुफान T20 ब्लास्ट स्पर्धेत पाहायला मिळाले. त्याने ४१ चेंडूत ११ ही स्पर्धा ग्लॅमॉर्गन आणि मिडलसेक्स या संघांमध्ये होती. मैदानावर समोरासमोर झालेल्या या लढतीत ख्रिस कुक ग्लॅमॉर्गन संघाचा भाग होता. त्यांच्या संघाला गरज असताना प्रथमच त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. स्कोअर बोर्डवर 50 धावा होताच 3 विकेट पडल्या होत्या. पण, यानंतर ख्रिस कुक मैदानात उतरला आणि त्याने चौकार षटकारांचा धडाकाच लावला आणि शतक पूर्ण केले. याआधी त्याने ६ वेळा अर्धशतक झळकावले होते.