नवी दिल्ली : ख्रिस गेलची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. धडाकेबाज फलंदाजीसाठी गेल ओळखला जातो. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत गेलच्या तुफानी खेळीचा आनंद साऱ्यांनीच लुटला होता. आता तर फक्त 15 धावा करत गेलने एक अनोखा विक्रम रचला आहे.
कोणत्याही खेळाडूला वयाचे बंधन असते, असे म्हटले जाते. गेलचे वय आहे 39. पण अजूनही युवा खेळाडूंना लाजवेल, अशी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात गेलने फक्त 15 धावा केल्या. त्याच्या लौकिकाला साजेश्या या धावा नाहीत. पण तरीही त्याने एका विक्रमाला गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
गेलने या सामन्यात 15 धावा करत मार्लोन सॅम्युअल्सचा विक्रम मोडीत काढला आहे. कारण वेस्ट इंडिजकडून ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सॅम्युअल्सच्या नावावर होता. या सामन्यापूर्वी गेल सॅम्युअल्सपेक्षा 5 धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे गेलने 15 धावा करत गेलने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करणाने फलंदाजख्रिस गेल-57 सामने -1622 रन.मार्लोन सॅम्युअल्स-67 सामने-1611 रन.ड्वेन ब्रावो-66 सामने-1142 रनलेंडल सिमंस-45 सामने-907 रन
ख्रिस गेल निवृत्तीचा निर्णय मागे घेणार?चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्याख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार व 14 षटकारांची आतषबाजी केली. गेलने या सामन्यात वन डेतील 10000 धावाही पूर्ण केल्या. हा पल्ला पार करणारा तो एकूण 14 वा आणि ब्रायन लारानंतर विंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. जवळपास सहा महिन्यानंतर वन डे संघात परतलेल्या गेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत धमाकाच उडवून दिला आहे. त्यामुळेच गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या विचारात आहे.इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा गेलने केली होती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वन डे सामन्यातील 162 धावांच्या खेळीनंतर वर्ल्ड कपनंतरही वन डे खेळत राहण्याचा विचार गेल करत आहे. तो म्हणाला,'' आतापर्यंतची ही माझी सर्वात दमदार खेळी ठरली. तो सामना अविस्मरणीय होता. मी आता बरेच ट्वेंटी-20 सामने खेळत आहे आणि त्यामुळे 50 षटकांच्या सामन्यात पुनरागमन करणे सोपं नक्कीच नाही. पण, आजूनही शरीर 50 षटकांच्या सामन्यांसाठी तंदुरूस्त आहे. वन डे सामन्यांसाठी आणखी थोडी मेहनत घेतल्यात मी काही काळ अजून खेळू शकतो. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पुढील निर्णय घेईन.''