सेंट जॉर्ज, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड : चौथ्या वन डे सामन्यात इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्याख्रिस गेलने 97 चेंडूंत 162 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार व 14 षटकारांची आतषबाजी केली. गेलने या सामन्यात वन डेतील 10000 धावाही पूर्ण केल्या. हा पल्ला पार करणारा तो एकूण 14 वा आणि ब्रायन लारानंतर विंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. जवळपास सहा महिन्यानंतर वन डे संघात परतलेल्या गेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत धमाकाच उडवून दिला आहे. त्यामुळेच गेल वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या विचारात आहे.
39 वर्षे 159 दिवसाचा गेल वन डेत 10000 धावा करणारा वयस्कर खेळाडू ठरला. या शिखरासाठी त्याने पदार्पणापासून आतापर्यंत 7110 दिवसांचा कालावधी घेतला. चौथ्या वन डेत 14 षटकार ठोकून गेलने भारताच्या रोहित शर्माचा विक्रम मोडला. गेलने इंग्लंडविरुद्ध 71 षटकार खेचले आहेत आणि एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याने नावावर केला. रोहितन्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध 66 षटकार लगावले आहेत.
पाहा व्हिडीओ...