लोकमत न्यूज नेटवर्ककिंग्ज इलेव्हन पंजाबच अंक तालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे. संघाला आतापर्यंत स्पर्धेत पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. संघातील खेळाडू के.एल. राहुल, मयांक अग्रवाल हे चांगल्या फॉर्ममध्ये असले तरी या संघाला सातत्याने पराभव पत्करावा लागत असल्याने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा याने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्याकाही दिवसांपासून लारा याला सातत्याने वाटते की ज्या संघात राहुल, अग्रवाल, ख्रिस गेल ग्लेन मॅक्सवेल यासारखी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्या संघाच्या खात्यात इतके पराभव नको. लाराने संघ व्यवस्थापनावरील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड योग्य नसल्याचे त्याने म्हटले आहे.
लारा याने म्हटले की, राहुल, अग्रवाल, गेल आणि मॅक्सवेल यांच्यासारखे शानदार फलंदाज संघात आहेत. गेल हा एक फिअर फॅक्टर आहे. जॉर्डन देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही. तो चांगला खेळाडू आहे. पण फॉर्मच्या बाहेर आहे. पण गेल हा सरस आहे.’लाराने केकेआर विरोधातील सामन्याच्या आधी आपले मत एका टीव्ही. कार्याक्रमात व्यक्त केले होते. लारा पुढे म्हणाला की, मॅक्सवेल हा गोलंदाजीही करतो. त्यामुळे कॉट्रेल ऐवजी गेलची निवड व्हावी.’
गेल रुग्णालयातब्रायन लारा याला जरी वाटत असले की ख्रिस गेल संघात असावा. तरी सध्या हे शक्य नसल्याचेच समोर येत आहे. ख्रिस गेल हा आजारी असल्याने त्याला अधिकच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल याने रुग्णालयातूनच आपला एक व्हिडियो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ४१ वर्षांच्या गेल याने म्हटले की, संघर्ष हा कायमच आहे. मी फक्त ऐवढेच सांगू शकतो. की कधीही विनासंघर्ष खाली येणार नाही.’