नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होताच पाच किंवा त्यापेक्षा अधिक विश्वकप स्पर्धेत खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या विशिष्ट क्लबमध्ये स्थान मिळवणारा जगातील १९ वा खेळाडू ठरेल.
भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर व पाकिस्तानचा जावेद मियांदाद यांनी सर्वाधिक सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत, पण १६ असे खेळाडू आहेत की त्यांनी ५ विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यात ब्रायन लारा, इम्रान खान, अर्जुन रणतुंगा, मुथय्या मुरलीधरन, वसीम अक्रम, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आदींचा समावेश आहे. गेल, लारा व शिवनारायण चंद्रपॉल यांच्यानंतर या पंक्तित स्थान मिळवणारा तिसरा कॅरेबियन खेळाडू ठरेल.भारताचा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह सात खेळाडू चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळतील. धोनी २००७ पासून या स्पर्धेत खेळत असून २०११ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. त्याने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत २० सामन्यांत ५०७ धावा व ३२ बळी घेतलेआहेत.
बांगलादेशचे ४ खेळाडू चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यात कर्णधार मशरेफी मुर्तजाचाही समावेश आहे. तो गेलनंतर एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, पण तो २०११ मध्ये संघाचा सदस्य नव्हता. या व्यतिरिक्त मुशफिकुर रहीम, शाकिब-अल-हसन व तमीम इक्बाल २००७ पासून तिन्ही विश्वचषक स्पर्धेत खेळलेले आहेत.गेल आतापर्यंत २००३, २००७, २०११ आणि २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळलेला आहे. त्यात त्याने २६ सामन्यात ३७.३७ च्या सरासरीने ९४४ धावा केल्या आहेत.विश्वचषक क्रिकेट : सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांच्या पंक्तीत स्थान मिळवणार1गेलने २१५ धावांची तडाखेबंद खेळीही केली आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत ३७ षटकार मारले असून तो द. आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्ससह संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे. यंदा पहिला षटकार मारताच तो ‘सिक्सर किंग’ होईल. यंदाच्या स्पर्धेत गेलनंतर सर्वाधिक षटकार न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या (२० षटकार) नावावर आहे.2गेलला विश्वचषक स्पर्धेत एक हजार धावा पल्ला गाठण्यासाठी केवळ ५६ धावांची गरज आहे. आतापर्यंत केवळ १७ फलंदाजांनी एक हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यात सचिन तेंडुलकर २२७८ धावांसह अव्वल स्थानी आहे. वेस्ट इंडिजतर्फे ब्रायन लारा (१२२५) व व्हीव्ह रिचर्ड््स (१०१३) यांनी अशी कामगिरी केली.
3यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत केवळ दोन खेळाडू असे आहेत की ज्यांनी गेल्या शतकात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यात गेलसह पाकच्या शोएब मलिकचा समावेश आहे. मलिकने आपला पहिला सामना १४ आॅक्टोबर १९९९ रोजी खेळला. पण, तो यापूर्वी केवळ २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकचा सदस्य होता.