Join us  

धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर

Chris Gayle on Dhoni Rohit Virat: भारताने गेल्या दोन दशकात तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 3:29 PM

Open in App

Chris Gayle on MS Dhoni Rohit Sharma Virat Kohli: वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ख्रिस गेलने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एका महान खेळाडूचे नाव घेतले. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तीनही क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. धोनीने भारतीय संघाला विजयाची सवय लावली. विराट कोहलीच्या काळात भारताने अतिशय आक्रमक क्रिकेट खेळले. तर रोहित शर्माने कर्णधार म्हणून खेळाडूंना क्रिकेट एन्जॉय करायला शिकवले. या तिघांपैकी सर्वोत्तम कर्णधार कोण याबाबत ख्रिस गेलने उत्तर दिले.

ख्रिस गेल म्हणतो...

ख्रिस गेल म्हणाला, 'धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे असं मला वाटतं. रोहित शर्माने चांगली कामगिरी केली. विराट कोहलीनेही आपली जबाबदारी पार पाडली. पण धोनीने खरोखरच एक नवीन ट्रेंड सेट केला." धोनीने २०० वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यातील ११० सामने जिंकले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या. धोनीने सर्व फॉरमॅटसह सर्वाधिक ३३२ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने १७८ सामने जिंकले तर १२० सामने गमावले.

सर्वात कठीण वाटणारा गोलंदाज कोण?

कारकिर्दीतील सर्वात कठीण गोलंदाज कोण असे विचारले असता गेल गमतीने म्हणाला, "सर्वात कठीण गोलंदाज जन्माला आला की नाही, मला माहीत नाही. प्रत्येक गोलंदाज कठीण असतोच. कारण प्रत्येक जण विकेट घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोलंदाज तुम्हाला कुठल्या तरी एका चेंडूने बाद करू शकतो, परंतु उच्चतम श्रेणीतील वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूं विरोधात खेळायला जास्त मजा येते. प्रत्येक गोलंदाज कठीण आहे, पण 'युनिव्हर्स बॉस' त्याहूनही कठीण आहे," असं हलकंफुलकं उत्तर त्याने दिले.

टॅग्स :ख्रिस गेलमहेंद्रसिंग धोनीरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ