IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) साठी होणाऱ्या ऑक्शनसाठी ( लिलाव) १२१४ खेळाडूंनी ( ८९६ भारतीय व ३१८ परदेशी) नावं नोंदवली आहेत. यामध्ये २७० खेळाडू यांनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर ९०३ खेळाडू अनकॅप आणि ४१ खेळाडू हे संलग्न संघटनेतील आहेत. पण, नोंदणी केलेल्या या खेळाडूंमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) याच्यासह मिचेल स्टार्क, सॅम कुरन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स या स्टार्सची नावं नाहीत. त्यामुळे आयपीएल २०२२मध्ये हे खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.
डेव्हिड वॉर्नर याच्याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या असतील. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आणि सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्यासह ४९ खेळांडूना २ कोटींची मुळ किंमतीत ठेवले गेले आहे. यामध्ये १७ भारतीय व ३२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आर अश्विन, श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वूड, ट्रेंट बोल्ट, फॅफ ड्यू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि ड्वेन ब्राव्हो हे या यादीत आहेत. १२ व १३ फेब्रुवारीला हे मेगा ऑक्शन होणार आहे.
१.५ कोटी मुळ किंमत - अमित मिश्रा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, आरोन फिंच, ख्रिस लीन, नॅथन लियॉन, केन रिचर्डसन, जॉनी बेअरस्टो,अॅलेक्स हेल्स, इयॉन मॉर्गन, डेविड मलान, अॅडन मिल्ने, कॉलिन मुन्रो, जिमी निशॅम, ग्लेन फिलिप्स, टीम साऊदी, कॉलिन इंग्राम, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, निकोलस पुरन
१ कोटी मुळ किंमत - पीयूष चावला, केदार जाधव, प्रसिद्ध कृष्णा, टी नटराजन, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे, नितिश राणा, वृद्धीमान सहा, कुलदीप यादव, जयंत यादव, मोहम्मद नबी, जेम्स फॉल्कनर, मोईजेस हेन्रीक्स, मार्नस लाबुशेन, रिली मेरेडिथ, जोश फिलिप, डी आर्सी शॉर्ट, अँड्य्रू टे, डॅन लॉरेन्स, लिएम लिव्हिंगस्टोन, टायमल मिल्स, ऑली पोप, डेव्हॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, एडन मार्कराम, रिली रोसोवू, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, वनिंदू हसरंगा, रोस्टन चेस, शेर्फाने रुथरफोर्ड