Chris Gayle-Vijay Mallya: T-20 क्रिकेटमध्ये थैमान घालणारा वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडून ख्रिस गेल निवृत्त आयुष्य जगत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला ख्रिस गेल काही फ्रँचायझी लीगमध्येच दिसतो. पण, सध्या ख्रिसची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा होत आहे. अलीकडेच ख्रिस गेलने भारतातून पळून गेलाला उद्योपती विजय मल्ल्याची भेट घेतली. विजय मल्ल्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. भारतातील फरार घोषित करण्यात आलेल्या विजय मल्ल्याने ट्विट केले, "माझा मित्र युनिव्हर्सल बॉस ख्रिस्तोफर हेन्री गेलला भेटून आनंद झाला. जेव्हा मी त्याला आरसीबीमध्ये घेऊन आलो तेव्हापासून आमची खूप चांगली मैत्री आहे." दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये आल्यानंतर ख्रिस गेल पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी जोडला गेला होता. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल या त्रिकुटामुळे आरसीबी सर्वात घातक संघ मानला जायचा. विजय मल्ल्याने ख्रिस गेलसोबतचा फोटो पोस्ट केल्यावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोकांनाही भेटण्यासाठी थोडा वेळ घ्या. एका चाहत्याने फोटो झूम करून लिहिले की सर, टेबलावर थोडे सॅलड पडले आहे. या फोटोवर अशाच मजेदार कमेंट्स पाहायला मिळाल्या. विजय मल्ल्या हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मालक आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा आयपीएल पार्ट्या खूप चर्चेत होत्या, तेव्हा फक्त विजय मल्ल्या या पार्ट्यांचे आकर्षण असायचा. मात्र, विजय मल्ल्यावरील खटला वाढला आणि त्याला भारत सोडावा लागला, तेव्हापासून तो परतलाच नाही.
ख्रिस गेलबद्दल बोलायचे झाले तर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय T20 सह विविध लीगमध्ये सुमारे 15,000 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 22 शतके आहेत, तर 1000 हून अधिक षटकार ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.