ठळक मुद्देटी-20 क्रिकेटमध्ये 100 षटकार लगावणारा ख्रिस गेल पहिलाच खेळाडू ठरला आहे37 वर्षीय ख्रिस गेलने आपल्या 52 व्या सामन्यातील 49व्या डावात हा भीमपराक्रम केला हा रेकॉर्ड करण्यासाठी ख्रिस गेलला 11 वर्ष 213 दिवस लागले
लंडन, दि. 18 - वेस्टइंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 100 षटकार लगावणारा ख्रिस गेल पहिलाच खेळाडू ठरला आहे. 37 वर्षीय ख्रिस गेलने आपल्या 52 व्या सामन्यातील 49व्या डावात हा भीमपराक्रम केला आहे. इंग्लंडविरोधातील टी-20 सामन्यात डेव्हिड विलेच्या गोलंदाजीवर ख्रिल गेलने जोरदार फटका लगावला आणि चेंडू सीमापार पोहोचवला. या सिक्ससोबतच ख्रिस गेलने आपले 100 सिक्स पुर्ण केले आणि एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. हा रेकॉर्ड करण्यासाठी ख्रिस गेलला 11 वर्ष 213 दिवस लागले.
ख्रिस गेलने या सामन्यात 21 चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. महत्वाचं म्हणजे यावेळी 36 धावा फक्त चौकार आणि षटकारांनीच केल्या होत्या. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना नऊ विकेट्स गमावत 176 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ मात्र 155 धावांवरच गारद झाला आणि वेस्ट इंडिजने 21 धावांनी हा सामना जिंकला.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इव्हिन लुईससोबत ख्रिस गेलने 39 चेंडूत 77 धावा केल्या. ख्रिल गेल आऊट झाला तेव्हा वेस्टइंडिजचा रन रेट प्रती ओव्हर 12 धावा होता. महत्वाचं म्हणजे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबात झालेल्या भांडणानतर ख्रिस गेल दोन वर्षांनी मैदानात उतरला होता.
टी-20 मधील जवळपास सर्वच रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावे आहेत. 309 सामन्यांमध्ये ख्रिस गेलने सर्वात जास्त शतक (18) आणि अर्धशतक (65) केले असून 772 षटकार आणि 804 चौकार लगावले आहेत. टी-20 सर्वात जलदगतीने शतक पुर्ण करण्याचा रेकॉर्डही ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने फक्त 30 चेंडूत शतक केलं आहे.
ख्रिस गेलने आयपील 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरोधात 175 धावांची नाबाद स्फोटक खेळी केली होती. या सामन्यात त्याने 17 षटकार लगावले होते. हादेखील टी-20मधील एक रेकॉर्ड आहे. ख्रिस गेलनंतर सर्वात जास्त षटकार लगावणा-या खेळाडूंमध्ये मॅक्कुलम (91), शेन वॉटसन (83) यांचा समावेश आहे, आणि दोघांनीही निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघात युवराज सिंहने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 74 षटकार लगावले आहेत.
Web Title: Chris Gayle's Bhimapramaka, the first player to score a century in Twenty20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.