इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) जेतेपद पटकावलं. पण, मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या पूर्ण मोसमात ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनला ( Chris Lynn) एकदाही प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिलेली नाही. आयपीएल संपल्यानंतर तीन आठवड्यानंतर लिननं त्याच्या फॅन्सला आनंदीत केले. त्यानं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या क्विन्सलँड प्रीमिअर ट्वेंटी-20 लीगच्या सामन्यात ५५ चेंडूंत १५४ धावा चोपल्या. त्यानं या खेळीदरम्यान २० षटकार खेचले.
लिननं या सामन्यात धावांची त्सुनामीच आणली. त्यानं १५४ पैकी १२० धावा या केवळ षटकार व चौकारांनी केल्या. त्यानं अखेरच्या ३४ चेंडूंत ११५ धावा केल्या आणि शतक पूर्ण करण्यासाठी त्यानं ३८ चेंडूंचा सामना केला.
पाहा व्हिडीओ...
लिनच्या या खेळीच्या जोरावर टूमबूल संघानं ६ बाद २२६ धावा केल्या. ३० वर्षीय लिनचा बिग बॅश लीगमध्येही दबदबा आहे. BBLच्या इतिहासात सर्वाधिक २३३२ धावांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.