Join us  

Chris Lynn : १७ चेंडूंत ८६ धावा; Mumbai Indians च्या माजी ओपनर ख्रिस लिनची शतकी खेळी, CSKच्या गोलंदाजांची धुलाई, Video 

Chris Lynn smashing second century : मुंबई इंडियन्सचा माजी सलामीवीर ख्रिस लिन सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या Vitality Blast ट्वेंटी-२० लीगमध्ये दमदार कामगिरी करतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:04 PM

Open in App

Chris Lynn smashing second century : मुंबई इंडियन्सचा माजी सलामीवीर ख्रिस लिन सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या Vitality Blast ट्वेंटी-२० लीगमध्ये दमदार कामगिरी करतोय. त्याने पाच सामन्यांत दुसरे शतक झळकावताना नॉर्थहॅम्पटन संघाला आणखी एक विजय मिळवून दिला. वॉर्सेस्टरशायर संघाविरुद्धची ही लढत नॉर्थहॅम्पटन संघाने ७३ धावांनी जिंकली. लिनच्या शतकी खेळीच्या जोरावर नॉर्थहॅम्पटनने ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात वॉर्सेस्टरशायरचा डाव १६.४ षटकांत १४७ धावांवर गुंडाळला.

प्रथम फलंदाजी करताना ख्रिस लिनला कर्णधार जोश कोबची चांगली साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. कोब ३० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५० धावांत माघारी परतला. त्यानंतर सैफ जैबने २७ आणि जिमी निशॅमने २४ धावांचा हातभार लावला.  लिनने ५७ चेंडूंत नाबाद ११३ धावा केल्या आणि या खेळीत ८ चौकार व ९ षटकारांचा पाऊस त्याने पाडला. वॉर्सेस्टरशायरचे नेतृत्व मोईन अलीकडे आहे आणि ड्वेन ब्राव्हो याच संघात आहे. लिनने चेन्नई सुपर किंग्सच्या या गोलंदाजांनाही नाही सोडले. अलीने २७ धावा दिल्या, पण ब्राव्होने १५ धावांत २ विकेट्स  घेतल्या.  प्रत्युत्तरात वॉर्सेस्टरशायरकडून एड बर्नार्ड ( ४२), जॅक हायनेस ( ३३) व ब्रेट डी'ऑलिव्हेरा ( २२) यांनाच चांगला खेळ करता आला. जोश कोबने २५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. टॉम टेलरनेही २६ धावांत ३ विकेट्स घेत विजयात मोठा वाटा उचलला. नॉर्थहॅम्पटनच्या लिनने ट्वेंटी-२० ब्लास्टमध्ये ६ डावांत ९४.७५च्या सरासरीने ३७९ धावा केल्या आहेत.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटइंग्लंडमुंबई इंडियन्सड्वेन ब्राव्हो
Open in App