India vs England 4th Test England's squad : लॉर्ड्सवरील पराभवानंतर इंग्लंडच्या संघानं लिड्सवर दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या कसोटीत टीम इंडियावर १ डाव व ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवता मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर, मार्क वूड हे प्रमुख शिलेदार संघाबाहेर असतानाही कर्णधार जो रूटनं नव्या व जुन्या सहकाऱ्यांसह तगड्या टीम इंडियाला धक्का दिला. त्यात आता चौथ्या कसोटीसाठी संघात दोन तगडे खेळाडू परतले आहेत. जोस बटलर हा दुसऱ्यांदा बाबा बनणार असल्यानं चौथ्या कसोटीला मुकणार आहे, परंतु त्याची उणीव भरून काढणारा फलंदाज संघात परतला आहे. स्टोक्सची उणीव भरून काढणारा अष्टपैलू खेळाडूही संघात परतला आहे. त्यामुळे २ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीत टीम इंडियाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
IPL 2021 जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विराट कोहलीला बसला धक्का, अष्टपैलू खेळाडूची माघार!
इंग्लंडनं चौथ्या कसोटीत अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स याला पाचारण केलं आहे, जोस बटलरच्या जागी सॅम बिलिंग संघात परतला असून, जॉनी बेअरस्टो यष्टिंमागे दिसणार आहे. ( England have recalled Chris Woakes to the Test squad to face India at The Oval) वोक्सनं २०२०च्या दमदार कामगिगीच्या जोरावर वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी वोस्क ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरून पडला होता अन् दुखापतीमुळे त्याला पहिल्या तीन कसोटीत खेळता आलेले नाही.
''हेडिंग्लीवरील विजयानंतर खेळाडूंचे मनोबल उंचावले आहेत. त्यात ख्रिस वोक्सच्या पुनरागमनानं संघ आणखी मजबूत झाला आहे. वॉर्विकशायर क्लबकडून त्यानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी तो हुकमी एक्का ठरणार आहे. मधल्या फळीत तो फलंदाजीही करू शकतो, ''असे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिलव्हरवूड यांनी सांगितले ( Chris Silverwood, England's head coach)