Join us  

Video: "छोटे मियाँ सुभान अल्लाह...", सरफराजच्या धाकट्या भावाला संघातून काढलं, पठ्ठ्यानं थेट त्रिशतक ठोकलं!

'बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह' हे गाणं क्रिपेटपटू सरफराज खान आणि त्याचा भाऊ मुशीर खान यांच्यासाठी एकदम योग्य ठरताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 1:10 PM

Open in App

'बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह' हे गाणं क्रिपेटपटू सरफराज खान आणि त्याचा भाऊ मुशीर खान यांच्यासाठी एकदम योग्य ठरताना दिसत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सध्या सरफराजची बॅट तळपली आहे. आता त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान यानेही धुमाकूळ घातला आहे. मुशीरने एका सामन्यात खणखणीत त्रिशतक ठोकलं आहे. याआधी मुंबईच्या रणजी संघातून मुशीर बाहेर फेकला गेला होता आणि आता त्यानं सीके नायडू ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध मुंबईसाठी त्रिशतक ठोकलंय.

लंच ब्रेकपर्यंत त्यानं ३५८ चेंडूत ३२० धावा केल्या. यादरम्यान मुशीरने ३३ चौकार आणि ७ षटकार मारले. मुशीरने डिसेंबरमध्ये सौराष्ट्रविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात त्याने मुंबईसाठी ३ सामने खेळले, परंतु त्याकडून अपेक्षित कामगिरी होऊ शकली नव्हती.

रणजीत ठरला फ्लॉपरणजीमध्ये ३ सामन्यात एकूण ५ डावांमध्ये मुशीरला फक्त एकदाच २५ पेक्षा जास्त धावा करता आल्या. आसामविरुद्ध त्याने ४२ धावा केल्या होत्या. ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी आहे. या सामन्यात त्याने ११ धावांत २ बळीही घेतले होते. मुशीरने शेवटचा रणजी सामना दिल्लीविरुद्ध खेळला होता आणि त्यानंतर तो संघाबाहेर होता. आता त्याने पुन्हा एकदा त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे.

अथर्वची भक्कम साथमुशीरच्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर मुंबईने लंच ब्रेकपर्यंत ५ गड्यांच्या मोबदल्यात ६२५ धावा केल्या आहेत. त्याला क्रीझवर कर्णधार अथर्व अंकोलेकर साथ देत आहे. त्यानं द्विशतक झळकावलं आहे. जलद ४०० धावा पूर्ण करण्याकडे मुशीरचे लक्ष आहे. दुसरीकडे, अथर्वची नजर त्रिशतकाकडे आहे. मुशीरचा भाऊ सरफराजबद्दल सांगायचे तर, त्याने गेल्या १० सामन्यांमध्ये ४ शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. तो सध्या तुफान फॉर्मात आहे.

Open in App